Rohit Pawar, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : अजितदादा पार्टीत नसतील तर कसं होईल? रोहित पवारांची विधानसभेत टोलेबाजी, सत्ताधाऱ्यांमध्ये चुळबुळ

Maharashtra Assembly Session Ajit Pawar NCP : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली होती.

Rajesh Charpe

Nagpur : विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. त्यांचे 41 आमदार निवडणूक आले. शरद पवार यांचे केवळ 10 आमदार जिंकले. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त सर्वच कुटुंब एकत्र आले होते. आज आमदार रोहित पवार यानी विधानसभेत आपला प्रश्न सोप्या शब्दांत समजावून सांगताना अजित पवार यांचा उल्लेख केला. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली होती. दादांच्या पाया पडून रोहित पवारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पवार कुटुंबीयांच्या दिवाळी पाडव्याला अजितदादा गेले नव्हते. मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या वाढिदवासाला दिल्ली येथे सर्व पवार कुटुंब एकत्रित आले होते. काल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना डाळींब भेट दिले. या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत.

अजितदादा महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यात आणि शरद पवार यांच्यासोबत असेलल्या आमदार व नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. यात लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात आले होते तर विधानसभेत दादांच्या विरोधात युगेंद्र पवारांना मैदानात उतरवण्यात आले होते. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात होते.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी आज विधानसभेत शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये बोगस औषधांच्या गोळ्यांचा मुद्दा उपस्थित केला. या गोळ्यांमध्ये आवश्यक असलेले घटकच नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याचे राजकीय उदाहरण देताना ते म्हणाले, अजितदादांची पार्टी आहे, अजितदादा त्या पार्टीत नसतील तर पार्टीचं कसं होईल, एकनाथ शिंदे त्यांच्या पार्टीत नसतील तर कसं होईल, तसं औषधामध्येही एपीआय असतो. तो महत्वपूर्ण घटक असतो.

रोहित पवार यांच्या या उदाहरणाने सभागृहात उपस्थित अनेक आमदारांच्या भुवया उंचावल्या. प्रामुख्याने सत्ताधारी बाकांवरील आमदारांमध्य चुळबुळ झाली. त्यावरून काहींनी रोहित पवारांना काहीतरी उद्देशून बोलल्याचे दिसले. रोहित पवारांनीही स्मितहास्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT