Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live News : ज्यांनी हे आरोप केले ते पैसे मोजायला बसले होते का?

Maharashtra Live News Updates : आज शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकरानामा ब्युरो

Kolhapur News : कोल्हापुरात होणाऱ्या अंतराराष्ट्रीय स्टेडियम उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव देण्यास विरोध

कोल्हापुरात होणाऱ्या अंतराराष्ट्रीय स्टेडियम उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव देण्यास विरोध करण्यात आला आहे. स्टेडियमला महाराणी ताराराणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेने केली आहे. भावनेचा विचार करून कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेऊ नये असं महासभेने म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या स्टेडियमला नाव द्यावं अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केली होती. मात्र त्याला आता अखिल भारत हिंदू महासभेने विरोध केला आहे.

Sanjay Raut on MNS ज्यांनी हे आरोप केले ते पैसे मोजायला बसले होते का?

चंद्रपुर मध्ये शिवसेना ठाकरे सेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला 1 - 1 कोटी दिले असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यालाच आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी पलटवार केला आहे. ज्यांनी हे आरोप केले ते पैसे मोजायला बसले होते का?असा सवाल राऊत यांनी उस्थित केला.

Nana Patekar Emotional Tribute to Ajit Pawar : 'अजित पवार माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते'

'अजित पवार हे माझे चांगले मित्र होते. ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते', असं म्हणत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. नाना पाटेकर यांनी अजित पवार यांना आपल्या हृदयाच्या अगदी जवळचे म्हटले आहे. सिनेकलाकारांनीही अजित पवारांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, नाना पाटेकर यांनीही भावनिक होत आपलं दु:ख व्यक्त केलं.

NCP Merger : राष्ट्रवादी विलिनीकरण, अजित पवारांकडे नेतृत्वाची तयारी होती; शशिकांत शिंदे यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, “विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता.” या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

Delhi Update : दिल्लीत अनेक नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

देशाची राजधानी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील अनेक नामांकित शाळांना धमकीचे ईमेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथक (BDS) विविध शाळांच्या परिसरात दाखल झाले असून कसून तपासणी केली जात आहे.

Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेना संघटनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता, एकनाथ शिंदे शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी संघटनेत भाकरी फिरवण्याची तयारी सुरू केली आहे. यात काहींचे मंत्रिपद देखील जाण्याची शक्यता आहे. तर जिल्हा संपर्कप्रमुखांना देखील डिच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Chandrapur Mahanagarpalika Politics : चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई होणार, संजय राऊत यांचे संकेत

'चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल. चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही. त्यांचं आम्ही समर्थन करत नाही. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल,' असंही शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सांगितले.

Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त भरण्यासंदर्भात हालचाली

विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागांसंदर्भात लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 5 जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dharashiv Update : अफूची शेती, ठाकरे सेनेच्या पदाधिकारी पक्षातून हकालपट्टी

कांदा पिकामध्ये अफूची शेती करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे सेनेचे वाशी उपतालुकाप्रमुख समाधान उघडे यांच्या शेतात 485 किलो अफूची झाडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊन संघटनेच्या शिस्तीला धक्का बसल्याचा ठपका ठेवत पक्षातून केली. हकालपट्टी, उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे यांनी अधिकृत पञक काढून हकालपट्टी केली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माहिती दिली.

Amaravati Update : अमरावती विभागात पीक कर्जाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे साडेतीन लाख शेतकरी थकबाकीदार

शेती उत्पादनातील घट, बाजारातील दरकपात आणि वाढत्या आर्थिक तणावामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. राज्य शासनाकडून कर्जमाफीबाबत हालचाली सुरू असताना अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा यवतमाळ या पाच जिल्ह्यांमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे 3 लाख 55 हजार शेतकरी थकबाकीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या शेतकऱ्यांकडे एकूण 3700 कोटी रुपयांहून अधिक पीककर्ज थकीत आहे. यापैकी सुमारे 2 लाख 44 हजार शेतकऱ्यांची खाती अपलोड करण्यात आली असून, उर्वरित शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी संस्थांकडील थकबाकीदारांची संपूर्ण माहिती शासनाकडे जमा केली जात आहे. दरम्यान,राज्य शासनाने कर्जमाफीसाठी निकष निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून याबाबत निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

Chandrakant Patil On Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाजप मंत्री चंद्रकांत पाटीलांची मोलाचा सल्ला

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना मोलाचा सल्ला दिला आहे. सुनेत्रा वहिनी यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यात बैठक घेतली, असे सांगत अजितदादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्माण केला होता. तो धाक आता सुनेत्रा वहिनी यांनी निर्माण करावा, असे आवाहन त्यांना ऑनलाईन बैठकीमध्ये केल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची त्या भेट घेणार आहेत. काही वेळात सुनेत्रा पवार सर्किट हाऊसला दाखल होणार आहेत.

मनसैनिकांकडून उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरण , आज वांदे न्यायालयात होणार सुनावणी

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT