Sarkarnama breaking news sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News LIVE : MNS News : माजी उपसरपंचाच्या मृत्यूचं कारण आले समोर...

Maharashtra Breaking News Today SEPTEMBAR 11 : महाराष्ट्रातील सर्व राजकीय प्रशासकीय घडामोडी पाहा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स

सरकारनामा ब्यूरो

धक्कादायक! बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट

बीड जिल्ह्यातील एकाच दिवशी दोन ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. एक इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यापाठोपाठ आता एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशाथ चॉकलेट अडकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, चिमुकलीच्या कुटुंबीयांना आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले

नागपूरच्या कडबी चौकात मोठी घटना घडली असून दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्याला लुटल्याची बातमी समोर येत आहे. हल्लेखोरांनी व्यापाऱ्यावर गोळीबार करत 50 लाख रुपये लुटले. या घटनेत व्यापारी जखमी झाला असून या घटनेमुळे नागपूर हादरले आहे. तर राजू दिपानी असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे.

धक्कादायक बीड जवळील इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

बीड जवळील इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. तर मुलीचा शोध सुरू होता. मात्र आज ही चिमुकली गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे बीडमध्ये भीतीचे वातावरण आहे.

माजी उपसरपंचाच्या मृत्यूचं कारण ठरलं हे आलिशान घर..

गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या हत्येनंतर आता याची चर्चा सुरू झाली आहे. बर्गे यांनी स्वत: आपल्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. पण ही आत्महत्या नसून तो घातपात असल्याचा दावा बर्गे यांच्या भाच्याने केल्याने खळबळ उडाली होती. या दरम्यान आता या मागिल खरे समोर आले असून ते कला केंद्रातील नर्तकी पूजासोबत उपसरपंचाचे प्रेमाचे सूत आहे. तर नर्तकीकडून केलेल्या गेवराईतील आलिशान घराची मागणी हेच या उपसरपंचाच्या मृत्यूचे कारण ठरले का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

राजकीय वाढदिवसाच्या धुंदीत निष्पाप तरुणाचा बळी; सहा जणांनाही चिरडले

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत मोठी दुर्घटना घडली. ही घटना जुन्नर शहरात घडली असून यात डीजे वाहन, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी होते. यावेळी ढोल-ताशा पथकातील तरुणाचा गाडी खाली चिरडून मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.

MNS News : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बोलवली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

काल राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर आज मुंबईत मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकींवर चर्चा होणार असल्याचं समजत आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर ही बैठक होत आहे.

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त PM मोदींनी लिहिला लेख

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज ७५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून अनेक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा देत विशेष संदेश दिला असून, त्यासोबत एक लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे 'एक्स' अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरने अर्थात एक्सने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याने अकाउंट सस्पेंड झाल्याचे माहिती आहे.

Nepal live: किरण माने यांनी केलेली पोस्ट त्यांच्या अंगलट येणार?

नेपाळबाबत अभिनेता किरण माने यांनी केलेली पोस्ट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोस्ट विरोधात भाजप आक्रमक झाला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेपाळ संबंधित पोस्ट करत भारतातील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी ही फेसबुक पोस्ट असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

Nepal Gen Z Protest Live Updates: १२३ भारतीय प्रवाशांसह दिल्लीला रवाना

नेपाळमधील हिंसाचारानंतर काठमांडू विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. बुधवारी एअर इंडियाचे विमान १२३ भारतीय प्रवाशांसह दिल्लीला रवाना झाले. नेपाळमधून भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे.

Pune crime News: आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आयुष कोमकर यांची गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हत्या करण्यात आली होती.

बारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणे पथकाने बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार अंजना विभीषण नागरगोजे (वय 38 वर्षे, ब.नं. 2309, पुणे ग्रामीण पोलीस) यांना ₹20,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT