Maharashtra Budget 2024 Live Marathi News Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2024 Live Marathi News: जरांगेंच्या तोंडातून आता 'तुतारी'चा आवाज येतोय: नितेश राणे

Maharashtra Budget 2024 Announcement Live Updates: विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. शेतकरी, मराठा आरक्षणांसह अन्य काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

मनोज जरांगेंच्या तोंडातून आता तुतारीचा आवाज येत आहे. ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका का करतात, असा सवाल  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. जरांगे हे शरद पवार गटाच्या जवळचे आहेत, असा आरोप राणे यांनी केला आहे. जरांगेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी राणेंनी केली.

विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरवात. मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत (२७ फेब्रुवारी)  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सूचना दिल्या. या निमित्ताने कविता, ललितलेख सादर करण्याचे आवाहन गोऱ्हे यांनी सभागृहाच्या नेत्यांना केले.

भाजप आमदार राजेंद्र पाटणी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सभागृहाची बैठक स्थगित करण्यात आली. उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता बैठक सुरु होईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

Maharashtra Budget 2024 Live Marathi News

मनोज जरांगे पाटलांची भाषा शिवराळ आहे, अशी टीका ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केली. जरांगेंच्या मागण्या मारुतीच्या शेपटाप्रमाणे आहे, असा टोला भुजबळांनी लगावला.

सभागृहाची बैठक स्थगित करण्यात आली. उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता बैठक सुरु होईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितले. विधानपरिषदेचे कामकाज बारा वाजता सुरु होणार आहे.

अजित पवार यांच्याकडून पुरवणी मागण्या सादर केल्या. भाजप आमदार राजेंद्र पाटणी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शोक प्रस्ताव मांडला.

आशा सेविकांनी चर्चेसाठी पुढे यावं, त्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.- अजित पवार. दीड महिन्यापासून आशा सेविकांचे आंदोलन सुरु आहे.

अधिवेशनाला सुरवात. अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे, त्यांची दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

पुढील चार महिन्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे . अजित पवार, देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात विधिमंडळात दाखल होणार आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

पुण्यात सापडलेले ड्रग्ज, मराठा आरक्षण, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, पोलिस ठाण्यातील गोळीबार, लोकप्रतिनिधीची हत्या,निवासी डॉक्टरांचा संप, यासह विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला वेढण्याच्या तयारीत आहेत.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विधानसभेचे कामकाज दुपारी ११ वाजता तर विधानपरिषदेचे कामकाज दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे. पाच दिवस हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनात विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. शेतकरी, मराठा आरक्षणांसह अन्य काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT