NCP leader Dhananjay Munde recalls Ajit Pawar’s development vision as Chief Minister Devendra Fadnavis presents the Maharashtra Budget 2026-27 in the Assembly. Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला अर्थसंकल्प, धनंजय मुंडेंनी काढली अजितदादांची आठवण

Maharashtra Budget 2026-27 : महाराष्ट्राचा 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांच्या विकास व्हिजनची आठवण झाली. धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिक प्रगतीचा रोडमॅप ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

Jagdish Pansare

Assembly Session 2025 News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचा पहिला अर्थसंकल्प आज (ता.6) विधिमडंळात मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मांडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सभागृहात अजित पवारांच्या नावे घोषणा देत आठवण काढली. फडणवीस यांनी ही अर्थसंकल्पाची सुरूवात करताना अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आज (ता. 6) राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थतज्ञ म्हणून देवेंद्र भाऊ यांची ख्याती आहे. शुक्रवारी (ता.6) दिवंगत अजितदादा पवार असते तर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता, मात्र दुर्दैवाने दादा आपल्यात नाहीत.

या अर्थसंकल्पातून अजितदादांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न आणि व्हिजन देवेंद्रभाऊ मांडतील, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असेल, अशी मला खात्री आहे. दादांच्या ऐवजी आज देवेंद्रभाऊ अर्थसंकल्प मांडत आहेत, दादांच्या व्हिजनसह राज्याच्या स्वप्नपूर्तीचा हा अर्थसंकल्प प्रेरक ठरेल, असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आजच्या (ता.6) अर्थसंकल्पासाठी देवेंद्र भाऊंना खूप खूप शुभेच्छा, असे आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर अजित पवारांची कायम मजबूत छाप राहिली आहे. आतापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. राज्याच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी एकूण 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक धोरणांवर त्यांची ठळक छाप होती.

अजित पवार यांनी 2010 साली पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी राज्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातही अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प मांडले. पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थमंत्री म्हणून काम करताना अजित पवार यांनी राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी निधी, सिंचन प्रकल्प, ग्रामीण विकास, तसेच उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देणाऱ्या योजनांवर विशेष भर दिला. त्यामुळे त्यांच्या अर्थसंकल्पांकडे राज्याच्या आर्थिक धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाच्या दस्तऐवज म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. त्यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT