Ajit Pawar Budget Live  Sarkarnama
महाराष्ट्र

ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात बंपर घोषणा; आगामी निवडणुकांमध्ये फायदा होणार?

Maharashtra Budget | Ajit Pawar | Mahavikas Aaghadi | Finance Minister : आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.

सरकारनामा ब्युरो

 सोन्यावरील मुद्रांक शुल्क माफ. 

सीएनजीसह सर्व नैसर्गिक वायुंवरील व्हॅट १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर. तिजोरीवर ८०० कोटी रुपयांचा तोटा पडणार. 

२४ हजार ३५३ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प. 

मावळमधील जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठी १० कोटी रुपये निधी. 

महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी निधी. 

कोल्हापूरमधील शाहू महाराजांच्या स्मारकासाठी निधी. 

फुलेवाडासाठी १०० कोटी रुपये निधी. 

नवी मुंबई इथे महाराष्ट्र भवन उभारणार. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र कार्यालय प्रस्ताव, 

जेष्ठ्य पत्रकार कल्याण निधी ५० कोटी रुपयांचा करणार. 

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची माहिती देण्यासाठी मराठवाड्यात कार्यक्रम राबवणार. मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांच्या समावेशाची उपसमिती. ७५ कोटी रुपये निधीची तरतुद. 

साताऱ्याच्या भिलार गावाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभारणार. 

नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मराठी भाषा संशोधन उपकेंद्र सुरु करणार. २५ कोटी रुपयांचा निधी. 

मराठी भाषेच्या संवर्धांनासाठी मुंबईत मराठी भाषा भवन. १०० कोटी रुपये निधी. 

पर्यावरण विभागाला २५३ कोटी रुपयांचा निधी. 

२३ नद्यांच्या संवर्धनाचा प्रस्ताव. 

पहिली ते आठवी शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाचा समावेश होणार. 

पुणे ववनविभागात बिबट्या सफारी प्रस्तावित. 

बाळासाहेब गोरिवडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन प्राण्यांची  सफारीची घोषणा. 

राज्यातील वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सौरउर्जा कुंपण योजना राबवणार. 

रायगड जिल्ह्यातील मौजे जामगाव इथे डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन आणि वनस्पती उद्यानाची घोषणा. 

नियोजन विभागाला ६८१८ कोटी ९९ लाख रुपये. 

सारथीला २५० कोटी रुपयांचा निधी. 

अष्टविनायक मंदिरांना ५० कोटी रुपये निधी. पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी ही निधी.  

सातारा जिल्ह्यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवणार. 

गडचिरोली इथे पोलिसांसाठी विशेष रुग्णालय उभारण्याची घोषणा. 

नक्षलग्रस्त भागातील पोलिसांच्या कमांडो भत्ता ८ हजार रुपये.

NCC मधील मुलांचा पोलिस सेवेत सहभाग वाढविण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करणार. 

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला ३८५ कोटी रुपयांचा निधी. 

विधी व न्याय विभागाला ५७८ कोटी रुपये. 

राज्यात १८ अतिरिक्त, २४ जलदगती आणि १४ कुटुंब न्यायलयांची निर्मिती. 

पर्यटन विभागाला १७०४ कोटी आणि सांस्कृतिक कार्य विभागाला १९३ कोटी रुपये निधी. 

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सर्वांना समजावा म्हणून हेरिटेज वॉक सुरु करणार. 

औरंगाबाद इथे वंदे मातरम सभागृहासाठी ४३ कोटी रुपये. 

स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता उत्पन्न मर्यादा ३० हजारांवर वाढविली. 

गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दर्शवणारी ध्वनी प्रकाश कार्यक्रम प्रस्तावित. 

कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी. वडाळा जिल्हा चंद्रपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याला मान्यता. २५ कोटी रुपयांचा निधी. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी प्रस्तावर दाखल करणार. 

अजंठा-वेरुळ, लोणावळा, महाबळेश्वर पर्यटन विकास प्रकल्प. रायगड किल्लासाठी १०० कोटी रुपये निधी. याशिवाय राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ६ किल्ल्यांसाठी १४ कोटी रुपये. 

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर ५० कोटी रुपयांचा जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित. जायकवाडी आणि गोसीखुर्द प्रकल्पांवरही जल पर्यटनाचा विकास करणार. 

पाणी-पुरवठा आणि स्वच्छता विभागाला ३ हजार २२३ कोटी रुपये निधी प्रस्तावित. 

मदत व पुनवर्सन विभागाला 

उर्जा विभागाला ९९२६ कोटी रुपये निधी. 

लातूर, धुळे, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सौरउर्जा प्रकल्प उभारणार. 

उद्योग विभागाला ८९५ कोटी रुपये निधी. 

दिंडोरीला आदिवासी औद्यागिक क्लस्टर उभरणार. 

नांदेड मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्राला २५ कोटी रुपयांचा निधी. 

विधवा महिलांसाठी पंडित रमाबाई योजना जाहिर. कोविड काळात विधवा झालेल्या महिलांना व्याजमुक्त कर्ज मिळणार. 

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहनाची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली. ५ हजार इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्र उभारणार. 

शिर्डीमध्ये मालवाहतूक टर्मिनल आणि रात्रीच्या उड्डाणासाठी सोय करणार. १५० कोटी रुपये देणार. रत्नागिरी विमानतळाला १०० कोटी रुपये. अमरावती विमानतळ, कोल्हापूर विमानतळ विकास करणार. गडचिरोलीला मिळणार नवीन विमानतळ. 

परिवहन विभागाला ३००३ कोटी रुपये, बंदर विकास विभागाला ३५४ कोटी, नगरविकास विभागाला ८८४१ कोटी रुपये. 

एसटी महामंडळाच्या पर्यावरण पुरक ३००० नव्या गाड्या देणार. १०३ बसस्थानकांना निधी उपलब्ध करुन देणार.  

पुण्यात स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रस्तावित. पिंपरी ते निगडी, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट मेट्रो विस्तार अहवाल तयार करण्याचे काम सुरु. 

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला १६ हजार निधी अपेक्षित. ८० टक्के खर्च राज्य सरकार करणार. 

मुंबई बाहेचा प्रदेश जलमार्गाने जोडणार. 

सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी १५७७३ कोटी रुपये. इमारती बांधकामसाठी १०८८ कोटी रुपयांचा निधी. 

समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा-गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.

पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटी रुपये निधी. 

रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील रेवस-कारंजा खाडीवरील २ किलोमिटर  ८९७ कोटी ७० लाख रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध. १०० हेक्टर भूसंपदानासाठी ५०० कोटी रुपये. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सुमारे ७५०० कोटी रुपये किमतीच्या १० हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजूरी. 

ग्रामविकास विभागाला ७७१८ आणि गृहनिर्माण विभागाला १०७१ कोटी रुपये. 

म्हाडाच्या विभागीय मंडळाला झोपडपट्टी विकासासाठी १०० कोटी रुपये. 

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेला ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. 

राज्यात मिशन महाग्राम राबवणार. 

महिला व बालविकास विभागाला २४७२ कोटी रुपये. 

आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटी रुपये. 

० ते १८ वयोगाटाचे पालन करणाऱ्या संस्था, कुटुंबाच्या प्रतिबालकाच्या अनुदानात वाढ. 

अंगणवाडी सेविकांना मोबाईल सेवा उपलब्ध करुन देणार. 

मौलाना आझाद महामंडळाचे भाग भांडवल ७०० कोटी रुपये. 

इतर मागास आणि बहूजन विभागाला ३४०० कोटी रुपये. 

ओबीसी आरक्षणासाठी स्वतंत्र समर्पित आयोगाची स्थापना. 

 महाज्योतीला २५० कोटी रुपयांचा निधी. 

सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाला २८७६ कोटी आणि अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता १२२३० कोटी. 

बार्टीला २५० कोटी रुपये.  

तृतीयपंथींना शिधापत्रिका देणार. 

अद्यायावत गटार सफाई यंत्रणा राबवणार. 

शालेय शिक्षण विभागाला २३५४ कोटी. क्रिडा विभागाला ३९५ कोटी रुपये. 

१० महापुरुषांशी संबंधित गावांमधील शाळांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी. 

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला १६०० कोटी. 

मुंबईमध्ये एलिफिस्टन आणि एसएनडीटी महाविद्यालयाला प्रत्येकी ५ कोटी रुपये. औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाला शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त १० कोटी रुपये आणि नागपूरच्या लक्ष्मी नारायण इंस्टिट्यूटला १० कोटी. 

शिवाजी विद्यापीठाला १० कोटी रुपये आणि मुंबई विद्यापीठाला २ कोटी रुपये. 

लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयाला १०० कोटी राखीव. 

स्टार्टअपसाठी १०० कोटी रुपयांचा स्टार्टअप फंड सुरु करणार.

राज्यातील प्रत्येक महसुल विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करणार. 

वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाला २ हजार ६१ कोटी रुपये मंजूर. 

पुणे शहराजवळ ३०० एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसीट उभारणार. सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार. 

आनंदीबाई जोशींच्या स्मरणार्थ देशातील होतकरु युवकांना देशातच संधी मिळावी यासाठी पदव्यूत्तर प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करणार. मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये फायदा. 

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला ३ हजार १८३ कोटी रुपये मंजूर. 

जालना इथे ३६५ खाटांचे नवीन मनोरुग्णालय. ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. 

४९ रुग्णालयांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी १ हजार ३९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर. 

सर्व जिल्ह्यांमध्ये महिला आणि नवजात शिशु केंद्र स्थापन करणार. त्यानुसार हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड इथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय. बीड, अकोला मधील बांधकाम तत्काळ सुरु होणार. 

मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुरुवात. टाटा कॅन्सर सेंटरसाठी रायगड इथे जमिन. 

शासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदुवरील फेको ही उपचार पद्धती सुरु करणार. ६० रुग्णालयांमध्ये उपचार होणार. २० कोटी मंजूर. 

शासकीय रुग्णालयात किडीनी स्टोनसाठी उपचार होणार. २०० खाटांच्या रुग्णालयात मिळणार सुविधा. १७ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर. 

नांदेड, अमरावती, भंडारा, जालना, अहमदनगर आणि सातारा याठिकाणी प्रत्येकी ५० खाटांचे प्रथम दर्जाचे शासकीय ट्रॉमा सेंटर उभे करणार. 

आरोग्य सेवांवर नियमित अर्थसंकल्प वगळता येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करणार. 

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाला ४०६ कोटी रुपयांचा निधी. 

सुदृढ पशुपालनासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र अशा ठिकाणी फिरत्या प्रयोगशाळा उभारणार. 

महाविकास आघाडी सरकार या वर्षात ६० कृषी पंपाना वीज देणार. 

राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक शेळी समूह प्रकल्प राबवण्यात येणार. ५० कोटी रुपयांचा निधी. 

परळमधील बैलघोडा हॉस्पिटल परिसरातील ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणासाठी १० कोटी. 

रोजगार हमी योजनेसाठी १ हजार ७५४ कोटी रुपये. रस्ते बांधण्याला प्राधान्य. फलोत्पादनासाठी ५४० कोटी रुपये मंजूर. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याच लक्ष्य.  

कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठांसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये. 

जलसंपदा विभागाला १३ हजार २५२ कोटी रुपयांचा निधी.  

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० ऐवजी ७५ हजार रुपये अनुदान

राज्यातील २० हजार पतसंस्थांचे संगणकीकरण करुन जिल्हा बँकांशी जोडणार. 

पुणे जिल्ह्यातील हवेलीमध्ये छत्रपती संभाजीराजेंचे स्मारक उभरणार, २५ कोटींचा निधी.

हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार

अजित पवार विधानभवनात दाखल

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) मुंबईत सुरू आहे. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्द्यांनी हे अविधेशन गाजत असतानात आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राज्याचा अर्थसंकल्प  (Maharashtra Budget 2022) सादर करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT