Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra cabinet expansion Live Update : हिवाळी अधिवेशनात 20 विधेयकं मांडणार - CM फडणवीस

Sarkarnama Headlines Maharashtra Politics: आज ता. 15 डिसेंबर, 2024 दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या राजकीय ताज्या घडामोडी, विश्लेषणे वाचा एका क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis : हिवाळी अधिवेशनात 20 विधेयकं मांडणार

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयकं मांडणार असल्याची माहिती दिली. शिवाय शपथ घेतलेल्या मंत्र्याचं येत्या दोन दिवसांत खातेवाटप केलं जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Ustad Zakir Hussain: झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर

बलावादक म्हणून ख्याती असलेले झाकिर हुसैन यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपाचर सुरू असल्याची माहिती आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रस होत असल्याची माहिती आहे.

Mahayuti press conference : दोन ते तीन दिवसांत खातेवाटप होणार - अजित पवार

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमचं सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र राहिल असं आश्वासनं दिलं. तसंच दोन ते तीन दिवसांत खातेवाटप होणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर उपमुख्यमंत्री यांनी बोलताना मागील अडीच वर्षात आम्ही टीम म्हणून कामं केल्याचं सांगितलं. तसंच आम्ही दोघे मिळून 200 च्या वर आमदार आणणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आम्हाला बहुमत मिळालं आणि आमचा शब्द खरा झाल्याचं ते म्हणाले. तर आमचं मिशन एकच आहे ते म्हणजे महाराष्ट्र समृद्ध करण्याचं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

Maharashtra cabinet expansion : नव्या मंत्रिमंडळात 'या' 6 नेत्यांची राज्यमंत्रिपदी वर्णी

राज्यमंत्री

माधुरी मिसाळ (BJP)

आशिष जैस्वाल (Shivsena)

पंकज भोयर (BJP)

मेघना बोर्डीकर (BJP)

इंद्रनील नाईक (NCP)

योगेश कदम (Shivsena)

Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेट बैठकीला सुरूवात

महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नुकताच नागपुरात पार पडला. या नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. तर आजच्या या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या बैठकीत लाडक्या बहिण योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

BJP Cabinet Expansion : भापजच्या या 19 नेत्यांनी घेतली मंत्रि‍पदाची शपथ

चंद्रशेखर बावनकुळे

गिरीश महाजन

चंद्रकांत पाटील

जयकुमार रावल

पंकजा मुंडे

पंकज भोयर

राधाकृष्ण विखे पाटील

मंगल प्रभात लोढा

शिवेंद्रराजे भोसले

मेघना बोर्डीकर

नितेश राणे

माधुरी पिसाळ

गणेश नाईक

आशिष शेलार

संजय सावकारे

आकाश फुंडकर

जयकुमार गोरे

अतुल सावे

अशोक उईके

Maharashtra cabinet expansion : अखेर महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडला

अखेर आज महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात पार पडला. नागपुरातील राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Yogesh Kadam : योगेश कदमांची मंत्रिपदी वर्णी

एकनाथ शिंदेंचे शिलेदार अशी ओळख असलेल्या रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Madhuri Misal took oath as minister : आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिपदी वर्णी

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Bharat Gogawale : भरत गोगावलेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मागील सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद कधी दिलं जाणार यावरून चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय त्यावरून अनेकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. मात्र अखेर गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Maharashtra Cabinet Ministers : शिवेंद्रराजे भोसले अन् जयकुमार गोरेंनी घेतली शपथ

मंत्रिपद शपथविधी सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील दोन आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पहिल्यांदा तर शंभूराज देसाई यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाचीशपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनीही शपथ घेतली.

Maharashtra Cabinet Ministers :बावनकुळे, विखे यांनी घेतली शपथ

मंत्रिपद शपथविधी सोहळ्याला सुरवात झाली आहे. राज्यपाल व्यासपीठावर पोहचले आहेत. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, गिरीश महाजन, आदित्य तटकरे या धनंजय मुंडे यांच्यासह आत्तापर्यंत १६ जणांनी शपथ घेतली असून आहे.

NCP News: स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले..

आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ ही अडीच वर्षांचा असेल, असे मोठ विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. नागपूर येथील देशपांडे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित होते.

Nitesh Rane : राणेंना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर कणकवलीत वाजले फटाके...

आमदार नीतेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर कणकवली (जि. सिंधुदुर्ग) शहरातील पटवर्धन चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला. बरेच दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता आणि हा विस्तार आज सायंकाळी होत आहे.तसेच आमदार नीतेश राणे यांनी व्हिडिओ काॅल करत शुभेच्छाही दिल्या.

Devendra Fadnavis : फडणवीसांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत, रॅलीतून भाजपचे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यादांच नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे नागपूर भाजपच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले असून यानिमित्ताने विजय रॅली काढण्यात आली आहे. यावेळी भाजपने नागपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नागपूरमध्ये तब्बल 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असल्याने, महायुतीमधील सर्व आमदार नागपुरात पोचले आहेत. तसेच महाविकास आघाडीचे आमदार देखील नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.

Rahul Gandhi: राहुल गांधी उद्या महाबळेश्वरला भेट देणार 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उद्या (सोमवार) महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांना भेट देणार आहेत. महाबळेश्वरमधील कडाक्याच्या थंडीचा ते आनंद घेणार असून कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.

Shiv Sena Maharashtra Cabinet expansion : शिवसेनेला मिळणार ही खाती

सार्वजनिक बांधकाम,( सार्वजनिक उपक्रम वगळून )

उद्योग

पर्यटन

आरोग्य

शालेय शिक्षण

नगरविकास

गृहनिर्माण

खनिकर्म

माजी सैनिक कल्याण

पाणी पुरवठा आणि स्वच्छता

जल संधरण

मराठी भाषा

Chandrasekhar Bawankule News: भाजपमध्ये खांदेपालट

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपजे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली जाणार आहे. त्यासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिले आहे.

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचा आज नागपुरात मेळावा

नागपूर येथील देशपांडे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुकणार आहे. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांना याबाबतची निमंत्रण देण्यात आले असून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षाचे सर्वच आमदार नागपुरात उपस्थित आहेत.

Cabinet expansion Live Update: शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेणार

भाजप कार्यालयातून मंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी चंद्रकांत पाटील, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, गिरीश महाजन पंकजा मुंडे यांना फोन करण्यात आला आहे. नागपूरमध्ये आज सायंकाळी चार वाजता शपथविधी समारंभ होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

Chhagan Bhujbal : अधिवेशन संपल्यानंतर भुजबळांचा  परदेश दौऱ्याचा मार्ग मोकळा

माजी मंत्री छगन भुजबळांना ईडीकडून मोठा दिलासा मिळाला आहे, विशेष कोर्टानं त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली आहे. कुटुंबासह परदेशात सहलीला जाण्यासाठी भुजबळांचा पासपोर्ट परत करण्याचे अंमलबजावणी संचालनालयाला (ED) कोर्टाने आदेश दिले आहे. परदेशी जाण्याची अनुमती दिल्यास भुजबळ पळून जातील, अन्यथा खटला लांबणीवर पडेल, असा दावा ईडीनं कोर्टात केला होता. आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भुजबळांचा कुटुंबासह परदेश दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra Politics:  मंत्रिमंडळाचा आज शपथविधी; अकार्यक्षम अन् वाचाळवीरांना मिळणार नारळ

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार आज नागपुरात होत आहे. याआधी 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या यादीत अनपेक्षित बदल पाहायला मिळण्याची शक्यता, अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना नारळ दिला जाण्याची चिन्हं आज दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहेत. नागपूरकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT