Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मंत्रि‍पदाचे शिलेदार ठरले, 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

Maharashtra Cabinet Expansion Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, विजय शिवतारे या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे

Roshan More

Maharashtra Cabinet Expansion : नागपूरमध्ये राज्य सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (रविवार) होणार आहे. मंत्रि‍पदासाठी इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढली आहे. मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युल्यानुसार सर्वाधिक मंत्रि‍पदे भाजपच्या वाट्याला आहेत. तर, शिवसेनेच्या वाट्याला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रि‍पदे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली आहे. या यादीमध्ये मागील मंत्रिमंडळामध्ये असलेल्या पाच जणांना पुन्हा संधी मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले उदय सामंत, शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे हे मंत्री होते त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. हे चारही जण आज संध्याकाळी चार वाजता मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.तर, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रि‍पदाची संधी मिळणार नसल्याची माहिती आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट ,योगश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईकरे या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आबिटकर यांना मंत्रि‍पदाच्या शपथेसाठी एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. संजय कदम यांना देखील मंत्रि‍पदाची लाॅटरी लागण्याची शक्यता आहे.

भाजपकडून शिवेंद्रराजे भोसलेंना फोन

भाजपकडून देखील मंत्रि‍पदाची नावे निश्चित करण्यात आली असून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शपथविधीसाठी फोन गेला आहे. तर, नितेश राणे हे देखील शपथ घेणार असून त्यांना देखील फोन गेला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या रुपाने साताऱ्याला मोठ्या प्रतीक्षेनंतर मंत्रपिदाची संधी मिळणार आहे.

मंत्रिपदासाठी फोन आलेले आमदार

उदय सांमत

दादा भूसे

गुलाबराव पाटील

शंभूराज देसाई

योगश कदम

आशिष जैस्वाल

भरत गोगावले

प्रकाश आबिटकर

प्रताप सरनाईक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT