Maharashtra Cabinet Meeting  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet meeting : अहिल्यादेवी नगरीतील मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय; धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी...

Ahilyanagar Meeting Key Decisions Government Schemes: ‘यशवंत विद्यार्थी योजना’ ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

Mangesh Mahale

Maharashtra Cabinet Meeting at Chaundi Ahilyanagar : मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर नंतर आज इतिहासात प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला होता. या ऐतिहासिक कॅबिनेट मिटिंगमध्ये सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार आहे. या निमित्ताने विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

बहुभाषिक चित्रपट निर्मिती

अहिल्यादेवींच्या जीवन आणि कार्याचा परिचय जगभरात करून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मितीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी जीवन जनमाणसात पोहचविण्यास मदत होणार आहे.

यशवंत विद्यार्थी योजना

‘यशवंत विद्यार्थी योजना’ ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत १०,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृहाची निर्मितीही केली जाणार आहे.

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान

मुलींसाठी अहिल्यानगरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्याचे ठरविण्यात आले. महिला आणि संस्थांना ‘आदिशक्ती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत.

मंदिर विकास

राज्यातील प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी तब्बल ५,५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे:

  • त्र्यंबकेश्वर विकास: २७५ कोटी रुपये

  • श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास: १,४४५ कोटी रुपये

  • श्री क्षेत्र माहुरगड विकास: ८२९ कोटी रुपये

  • श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास: १,८६५ कोटी रुपये

  • श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास: २५९ कोटी रुपये

  • अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार: १४७ कोटी रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT