Maharashtra News : महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ मिळणार की नवे आयुक्त निवडले जाणार याची चर्चा होती. केंद्र सरकारकडे अग्रवाल यांना मुदतवाढ मिळावी, म्हणून अद्यापही कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही.
राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता त्यांनी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर तीन वरिष्ठ आएएएस अधिकारी मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर आणि संजय सेठी यांच्या नावांची चर्चा मुख्य सचिवपदासाठी आहे.
हे तीनही IAS अधिकारी 1992 च्या बॅचचे असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मनीषा म्हैसकर या सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्यसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्या मार्च 2029 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत त्या आघाडीवर असल्याचे मानले जाते.
त्यांनी नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैद्यकीय शिक्षण या विभागांसह सांगलीच्या जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
मलिंद म्हैसकर हे नोव्हेंबर 2028 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. सध्या ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, वर्ध्याचे जिल्हाधिकारी, तसेच एमएमआरडीएमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
संजय सेठी यांच्याकडे सध्या परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून जबाबदारी आहे. जेएनपीटी, एमआयडीसी व उद्योग विभागामध्ये त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त, तसेच ठाणे आणि नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.