Harshvardhan Sapkal Sarkarnama
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : "मी नाही, भाजपवालेच फडणवीसांची तुलना औरंग्याशी करतात"; सपकाळ आपल्या विधानावर ठाम

Harshvardhan Sapkal On BJP : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी केली. त्यांच्या या वक्तव्यावरून आता गदारोळ सुरू झाला असून भाजपचे नेते सपकाळ यांच्यावर तुटून पडले आहेत.

Aslam Shanedivan

Mumbai News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी केली. औरंगजेब क्रूर शासक होता त्याचप्रकारे आज देवेंद्र फडणवीसही वागत असून ते राजकारभार करत आहेत. भाजपवाल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली होती. या टीकेनंतर आता त्यांच्यावर भाजपकडून जोरदार पलटवार केले जात असून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांच्यावर भाजपचे नेते जोरदार टीका करत असतानाच, हर्षवर्धन सपकाळ यांनी, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून फडणवीस यांच्यावर नाही तर राजकारभारावर आपण टीका केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांच्या समोर आले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे प्रकरण सपा आमदार आमदार अबू आझमींच्या वक्तव्यापासून सुरू झाले असून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले आहे. तर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विविध ठिकाणी आज (ता.17) आंदोलने करण्यात आली आहेत. या टीकेला हर्षवर्धन सपकाळ यांनी पलटवार करताना, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी, आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केलेली नाही. तर आपण येथील राज्यकारभाराची तुलना केली होती. राज्यात ज्या पद्धतीने अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्यावर ज्यापद्धतीने सरकार पावले टाकत आहे यावर मी बोललो होतो. मात्र कालपासून भाजपचेच लोक माझ्यावर टीका करताना थेट देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करत आहेत. सरसकट भाजपचे सर्व नेते मंडळी फडणवीस हेच औरंगजेबासारखे वागत असल्याचं बोलत आहेत. आणि वर कांगावा करत आहेत. याचा अर्थ हाच आहे की फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील लोक औरंगजेब ठरू पाहतायत. हेच आता या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोर आले आहे.

तसेच सध्या बावनकुळे साहेब, नारायण राणे साहेब आणि भाजपची इतर मंडळी कालपासून माझ्या संदर्भामध्ये जी भाषा वापरत आहेत. ती अतिशय खालच्या स्तराची आहे. जी वापरण्याची आवश्यकता नाही. स्वतःला संस्कृत पक्षाचे म्हणणारे लोकच आज काय शब्दावली वापरतात, त्यांचे ट्रोलर्स कसे खालच्या तापळीवर जातात हे आता उघड होत आहे. या प्रकरणामुळे भाजपचा जो खरा चेहरा जो आहे, तो या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर उघड झाल्याचेही सपकाळ यांनी म्हटलं आहे.

एकीकडे फडणवीस यांच्याबद्दल कुठे काय बोललं गेलं तर महाराष्ट्राची अस्मिता लयाला जाते अशा प्रकारचे वक्तव्य बावनकुळे करतात. पण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणीही बोलतं, महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा देत, छत्रपतींचा अपमान करतो त्याला हे सुरक्षा देतात. राहुल सोलापूरकरला प्रशांत कोरटकरला सुरक्षा दिली जाते. यांच्यासह बजरंगदल किंवा विश्व हिंदू परिषदेवर कोणतीच कारवाई केली जाते नाही. भाजपवाले यावर तोंड उघडायला तयार नाहीत.

छत्रपतींचा अपमान केल्यानंतर देखील महाराष्ट्राची अस्मिता दुखवत नाही. पण फडणवीस यांच्यावर त्यांच्या कारभारावर बोट ठेवल्यास पोटात वेदना होतात. लगेच भाजपची पोटदुखी होते. आता भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT