Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : वाढत्या महागाईमुळे मुंबईसह राज्यभरात अन्नधान्य, कडधाने, डाळी, साखर, खाद्यतेलांमध्ये मोठी दरवाढ

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी परिस्थितीसह राज्यातील पाच शिक्षक अन् पदवीधर विधान परिषद निवडणुका आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांमधील राजकीय घडामोडीसह महत्वाच्या अपडेट एकाच क्लिकवर.....

सरकारनामा ब्युरो

Latur Crime : लातूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण! 11 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

लातूर शहरात टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान चार दिवसापूर्वीच एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेत एका तरुणाला नग्न करून पार्श्वभागात पेट्रोल टाकून मारहाणीची घटना ताजी असतानाच, लातूर मधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका तरुणाला चार चाकी गाडी टाकून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Thane News : ‘ऑनलाइन गेमिंग’द्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक; मुंबई येथील टोळीचा पर्दाफाश

‘ऑनलाइन गेमिंग’द्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील टोळीचा भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी भगवान दास या सूत्रधारासह दहा आरोपींना अटक केली असून, 32 मोबाईल फोन, 49 एटीएम कार्ड, 40 सिम कार्ड, चार लॅपटॉप आणि मोबाईल चार्जर यांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Latur News : आईशी पैशांवरून भांडण; खाणीत आढळला तरुणाचा मृतदेह

आईशी पैशांवरून झालेल्या भांडणानंतर घर सोडून गेलेल्या निक्षय परमेश्वर कोतमले (वय 30, पेठ, ता. औसा) या तरुणाचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील पाण्याने भरलेल्या खाणीत आढळला. बुधोडा गावाच्या हद्दीतील खाणीत गुरुवारी सायंकाळी दगड फोडण्याच्या कारखान्यातील एका कामगाराला त्याचा मृतदेह तरंगताना दिसला.

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील दावलमलिकवाडी येथे तरुणाचा खून

धाराशिव जिल्ह्यातील दावलमलिकवाडी (ता. उमरगा) येथे शस्त्राने वार करून भारत गजेंद्र कवठे (वय 47) यांचा खून केल्याची घटना मंगळवारी (ता. 20) रात्री घडली. शेतीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत गजेंद्र कवठे यांचा त्यांच्या घरामागे मृतदेह आढळला. भारत कवठे यांच्या पत्नी सखुबाई यांनी येथील पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News : वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या महिला डॉक्टरला वर्ध्यात मारहाण

वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलेल्या एका व्यक्तीने महिला डॉक्टर डॉ. श्रद्धा भुमरे यांच्या कानशिलात लगावल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडली. या घटनेच्या निषेधार्थ सरकारी डॉक्टरांनी आंदोलन केले. तळेगाव शामजीपंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी (ता. 21 ऑक्टोबर) ही घटना घडली. कादीर अली रज्जाक अली याला एका घटनेत दुखापत झाली होती. तपासणीसाठी पाच पोलिस कर्मचारी त्याला आरोग्य केंद्रात घेऊन आले होते. तपासणी सुरू असताना अलीने हा हल्ला केला. त्यावेळी पोलिस पथक उपस्थित असल्याची माहिती तळेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी मंगेश भोयर यांनी दिली.

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील एआय डेटा सेंटर, सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, न्यूक्लियर पॉवर आणि बॅटरी प्रकल्पांना शेतकऱ्यांचा विरोध

सोलापूर जिल्ह्यातील चिखलठाण उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर, सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, न्यूक्लियर पॉवर आणि बॅटरी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पांविरोधात 31 ऑक्टोबरला हिंगणगाव येथील पुलावर तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता. 22) कुंभेज फाटा येथे शेतकऱ्यांची विशेष बैठक पार पडली.

Mumbai News : वाढत्या महागाईमुळे मुंबईसह राज्यभरात अन्नधान्य, कडधाने, डाळी, साखर, खाद्यतेलांमध्ये मोठी दरवाढ

यंदाच्या दिवाळीत खरेदीचे नियोजन करताना, ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. मुंबईसह राज्यभरात अन्नधान्य, कडधाने, डाळी, साखर, खाद्यतेलांसह अन्न जिन्नसांच्या किमतीत नजीकच्या कालावधीत मोठी दरवाढ झाली आहे. हवामानातील अनिश्चितता, जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ आणि सणासुदीनिमित्त वाढलेल्या मागणीमुळे विविध वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा आर्थिक ताण पडत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT