Fadnavis Government : बार्टी, सारथी, महाज्योती आणि आर्टी अशा संस्थांमध्ये दरवर्षी शेकडो मुले प्रवेश घेत असतात. या विद्यार्थ्यांवर सरकारही कोट्यावधी रुपये खर्च करते. 2018 ते 2025 या काळात आतापर्यंत या संस्थांमधील विद्यार्थ्यांवर साधारण 750 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पण यातून मुलांना होणारा फायदा, त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या, त्यांच्याकडून सुरु करण्यात येणारे व्यवसाय या गोष्टी अत्यंत नगण्य आहेत. त्यामुळेच फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात बोलताना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, त्यांना देण्यात येणारी सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया या सगळ्यांबाबत समान धोरण राबवण्यात येईल.
सारथी संस्थेमध्ये 2018 ते 2025 या कालावधीत 83 अभ्यासक्रमांमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन, शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले. त्यापैकी 3 हजार म्हणजे केवळ 1 टक्का विद्यार्थ्यांनी पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. त्या एक टक्का विद्यार्थ्यांसाठी 280 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. 5 वर्षांत एका विद्यार्थ्यामागे 30 लाख रुपये खर्च झाला, ही बाब गांभीर्यानं घेण्यासारखी आहे.
यामुळेच यापुढील काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल, अशाच अभ्यासक्रमांना साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरवणं आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशीही घोषणा अजित पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.