मराठ्यांचं वाटोळं करून पुढे जाऊन देणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा महायुतीच्या नेत्यांनी हिन वागणूक दिली आहे. तुम्ही मराठा समाजासाठी कोणते फायदेशीर निर्णय घेतले? असा सवाल जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला आहे.
माझ्या पक्षातून ज्यांना तिकीट मिळणार नाही, ते तिकडे जात आहेत. ज्यांना तिकीट मिळेल, ते माझ्यासोबत आहेत, असं अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांवर भाष्य केलं आहे.
मराठा समाजाचा वापर फक्त सत्तेसाठी करण्यात आला. महायुती सरकारनं मराठा आरक्षण टिकवलं. आरक्षण रद्द करायला कोण गेलं? महायुतीनं काय दिलं याचा विचार जरागेंनी करावा, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.
शरद पवार यांनी आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असं आव्हान फडणवीस यांनी दिलं आहे.
'लाडक्या बहीण योजने'ला हात लावला तर करेक्ट कार्यक्रम होणार, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
आमच्या सरकारच्या काळात 60 ते 70 कॅबिनेटच्या बैठका झाल्या. त्यात तब्बल 900 निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
लाडक्या बहीणींना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. कारण, देण्याची आमची नियत आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
सुनील केदार यांचा माणूस लाडकी बहीण योजनेविरोधात न्यायालयात गेला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
महाविकास आघाडी गुजरातची प्रसिद्धी करतेय, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
अडीच वर्षांत महाविकास आघाडीनं प्रकल्प बंद करण्याचं काम केलं आहे, असा आरोप मुख्यमंत्री शिंंदे यांनी केला.
आम्ही एवढी कामे केलीत, की ते रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाही. रिपोर्ट कार्ड करायला हिंमत लागते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
ठाकरे म्हणालेत, आमचं सरकार आल्यानंतर सर्व योजना बंद करू. ठाकरे पुन्हा एकदा योजना बंद करायला निघाले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ज्यांचा गृहमंत्री तुरुंगात गेला, ते कायद्यावर बोलतात. मात्र, आता काही घटना घडल्या की कारवाई होते. महिलांना सुरक्षित ठेवणार, असं फडणवीस यांनी म्हटलं.
राज्यातील शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
स्थगिती सरकार गेल्यानंतर प्रगतीचं सरकार आलं, असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, काहींसाठी ऐलान, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
लाडकी बहीण योजना ही तात्पुरती नाही आहे. 45 हजार कोटींची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये भविष्यात वाढ होईल, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
आरोप प्रत्यारोप करताना विरोधकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, अशा शब्दांत अजितदादा पवार यांनी फटकारलं आहे.
आमच्यावर अनेक आरोप करण्यात आले. विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह परसवण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. यावेळी महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड प्रदर्शित करण्यात आलं.
अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जनतेशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलतात याकडे सगळ्याचंं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.