CM Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत फडणवीसांचा महत्वाचा खुलासा! 6.22 बँक खाती झाली Nil, कर्जखात्यांच्या CIBIL बाबतही दिलं स्पष्टीकरण

Farmer Loan Waiver: खात्यात कमी पैसे आल्याचा आणि CIBIL बाबत सुरु असलेल्या चर्चांवरही तोडगा काढण्यात आल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Amit Ujagare

Farmer Loan Waiver: महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देणं सुरु झालं आहे. पण हा लाभ देत असताना शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, या सर्व तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचा खुलासा केला.

फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आषाढी एकादशी दिवशी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही यादी सर्व ग्रामपंचायतींना पाठवली होती, यात अत्यंत साध्या पद्धतीनं म्हणजेच शेतकऱ्यांनी कुठलाही अर्ज न करता केवळ आधारची पडताळणी करायचं काम हाती घेतलं होतं. त्यानुसार, ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता ६ लाख २२ हजार २०७ खात्यांमध्ये सरकारकडून पाठवला गेला आहे, त्यामुळं ही कर्जखाती आता Nil झाली आहेत.

मध्यंतरी काही गैरसमज असेही झाले होते की, "आमच्यावरील कर्ज जास्त दिसत असून आमच्यासाठी मंजुरीची रक्कम कमी आहे. पण NPA वर लावलेलं जे व्याज होतं त्यामुळं हे पैसे जास्त दिसत होते. पण बँकांनी आता एनपीएवरील व्याज रद्द केल्यानं ते पैसे आणि शासनानं त्यांच्या खात्यात भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळं ही कर्जखाती निल झाली आहेत. आता रोज मोठ्या प्रमाणावर जसजसी खात्यांची पडताळी होईल तसंतशी या खात्यात पैसे जातील.

फडणवीस म्हणाले, "अजुनही जवळपास १९ लाख खात्यांची प्रक्रिया सुरु आहे, १२ लाख खाती ही बँकांना परत पाठवली आहेत कारण बँकांनी या चुका केल्या आहेत. बँकांनी हे सांगितलं की साधारण आठवड्याभरात ती खाती सुधारुन आम्ही परत करु. त्यामुळं आता ही सर्व खाती क्लिअर होऊन त्यात पैसे टाकण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुढच्या काळात सगळे जेवढे खाती पडळणी होती त्यात पैसे टाकून कर्जमाफीचा जो फायदा आहे तो आपण देणार आहोत"

सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला यासाठी वेळ लागला कारण, या याद्या ग्रामपंचायतींपर्यंत जातील त्या ठिकाणी याद्यांचं वाचन होईल, लोकांना हे समजलं पाहिजे लोकांना फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यानुसार शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया करत आहेत, त्यानुसार त्यात पैसेही पाठवले जात आहे.

महिन्याभरात ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. पण पूर्वानुभवानुसार ८० टक्के काम एका महिन्यात होतं, पण २० टक्के कामाला वेळ लागतो. त्यात काही ना काही अडचणी असतात. यात लाखो शेतकऱ्यांचा रेकॉर्ड असतो यात शेतकऱ्यांची तर कधी बँकांची अडचण असते. कागदपत्रांची पूर्तता होत असते. त्यामुळं आम्ही आता या कर्जमाफी योजनेत दोनच टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यात सगळे कर्जमाफीचे पैसे देणार आहोत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनचे पैसे देणार आहोत.

दुसरं कर्ज घेताना शेतकऱ्यांना बिल्कुल अडचण येणार नसल्याचं सगळ्या बँकांनी सांगितलं आहे. अशाही अफवा पसरवल्या जात आहेत की, ओटीएस झाल्यानं सीबील लागणार आहे. पण यात कुठेही ओटीएस नाही. फक्त लावलेलं जास्तीच व्याज बँकेनी रद्द केलं आहे. बाकी पूर्ण पैसे सरकार भरते आहे. त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला CIBIL ची अट लागणार नाही.

काही खात्यांमध्ये त्रुटी आहेत. यामध्ये दुबार खाती आहेत, तर काही ठिकाणी नंबर मिसिंग, नाव मिसिंग आहेत. त्यामुळं ही खाती परत पाठवली आहेत. ही संपूर्ण डिजिटल पद्धत असल्यानं डीबीटी असल्यानं सर्व गोष्टींची पडताळणी करावी लागते, अशा विविध प्रश्नांची उत्तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT