Chandrakant Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

CJP Protest : दिल्लीत दगडफेकीतील प्रत्येक दगड उचललाय, त्यावरचे फिंगरप्रिंट आधारला लिंक होतील : चंद्रकांतदादांचा मोठा दावा

Maharashtra farmer loan waiver News : शेतकऱ्यांना वाटत असेल त्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही. पण दोन लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे त्यांची कर्जमाफी होणारच असल्याचे ते म्हणाले.

Rahul Gadkar

Kolhapur : "दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे. तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. ज्यांना पकडले ते कोणकोणत्या गुन्ह्यात होते त्याचे पोलिसांनी विश्लेषण केले आहे. पोलिसांनी सांगितले की, तिथे पडलेले प्रत्येक दगड उचलले आहे. त्या दगडावर असणारे फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, लोकशाहीमध्ये तुम्ही देखील आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. पण त्यांनी आरोप केले म्हणजे ते सर्व खरं असतं असं नाही.

दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे. तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. ज्यांना पकडले ते कोणकोणत्या गुन्ह्यात होते त्याचे पोलिसांनी विश्लेषण केले आहे. पोलिसांनी सांगितले की, तिथे पडलेले प्रत्येक दगड उचलले आहे. त्या दगडावर असणारे फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील.

एका बाजूने राहुल गांधी आरोप करत आहेत. अमित शहा यांनी हा लाठीचार्ज करायला लावला असा तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकडेवारी दिली आहे. याबाबत पोलिसांना देखील प्रूव्ह करावे लागेल आणि राहुल गांधी यांना देखील प्रूव्ह करावे लागेल, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील 2 लाख 55 हजार 168 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्जमाफी थकीत राहिली तर शेतकरी अडचणीत येतील म्हणून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. वीजबिल थकबाकी देखील सरकारने माफ केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 55 हजार 168 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे.

प्रत्यक्ष जिल्ह्यात कर्जमाफीची संख्या कमी आहे, पण अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्याची संख्या अधिक असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना वाटत असेल त्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही. पण दोन लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे त्यांची कर्जमाफी होणारच असल्याचे ते म्हणाले.

हवेत बार मारणाऱ्यांची संख्या अधिक :

राजू शेट्टी यांनी वीज बिल माफी घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. यावर ते म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी त्यांनी त्यांचे मुद्दे मांडावेत. घोटाळा झाला असेल तर त्यांनी सांगावे. सध्या देशात आणि राज्यात हवेत बार मारणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. ते म्हणतात घोटाळा झाला आहे, आम्ही म्हणतो घोटाळा झाला नाही, असे पाटील यावेळी म्हणाले.

गोकुळच्या निवडणुकीसाठी सहकार प्राधिकरण जबाबदार :

गोकुळच्या निवडणुकीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,'अनेक संस्था ह्या घटनेप्रमाणे स्वायत्त असतात. स्वायत्त असणाऱ्या संस्थांमध्ये सरकारने हस्तक्षेप करायचा नसतो. सहकारांमधल्या निवडणुका घेण्यासाठी सहकार प्राधिकरण आहे. ते त्यांचे अधिकार आहेत.

सहकार प्राधिकरणाला हायकोर्टाचा निर्णय पोहोचला आहे. जर सहकार प्राधिकरणाला इतक्या घाईमध्ये निवडणुका घेणे शक्य नसेल तर ते कोर्टात जातील. सहकार प्राधिकरण आधीच मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहे. कोर्टाने त्यांची विनंती फेटाळली तर त्यांना ओढाताण करून निवडणूक घ्यावी लागेल. याबाबत निवडणुका संदर्भात उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही, ती प्राधिकरणाची आहे.

तुकाराम मुंढेंवरील तक्रारींची दखल मुख्यमंत्री घेतील :

तुकाराम मुंढे यांच्याबाबत अधिकाऱ्यानी तक्रारी दिल्या आहेत. तक्रारी खऱ्या असतील तर त्याची दखल मुख्यमंत्री घेतील. त्यांनी कुठे कुठे धाडी मारल्या. काय कारवाई केली हे ठीक आहे. पण दूध या विषयात या माणसाने बोगस दूध सर्व बंद केले. बोगस दुधामध्ये फक्त पाणी नाही तर शरीराला घातक असणारे अनेक रसायन आहे, असे असताना देखील त्यांच्याबद्दल कंप्लेंट असू शकतात, असेही पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT