CM Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Farmer Loan Waiver : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! आणखी 4.15 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय!

Maharashtra cabinet decision on farmer loan waiver : महाराष्ट्रातील आणखी 4.15 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबतची माहिती, कर्जमाफी योजनेचे अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.

Rashmi Mane

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा करणाऱ्या आणखी 4.15 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे. विशेषतः केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ?

राज्यातील आतापर्यंत 15,85,493 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 13,275 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आणखी 4.15 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे सांगितले जात आहे. केवायसी पूर्ण असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT