Dattatray Bharne 
महाराष्ट्र

Maharashtra Floods: कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी! एकूण ६ कोटींची मदत देणार; कृषीमंत्री भरणेंची घोषणा

Maharashtra Floods: महापुरात शेतीचं तसंच ऊस शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं यंदाचा ऊस गळीत हंगाम लांबणार आहे, पण तो कधीपासून सुरु होईल हे देखील कृषीमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Amit Ujagare

Maharashtra Floods: राज्यात अतिवृष्टी आणि महापुरानं थैमान घातलेलं असल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग इथल्या ग्रामीण भागात या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून केवळ शेतकरीच नव्हे तर शेतमजूर, कामगार वर्ग, छोटे व्यापारी याचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या सर्व पूरबाधितांच्या मदतीसाठी राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. ही एकूण मदत सुमारे ६ कोटी रुपयांहून अधिक असणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याची माहिती दिली आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री भरणे यांनी याची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, आमच्या कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला त्यांचा स्वतःचा एक दिवसांचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं त्यांनी मला पत्र दिलेलं आहे. याची साधारण ६ कोटी १७ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम जमा होत आहे.

यामध्ये कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, कृषी विभागाशी संबंधित इतर विभाग यातील सर्व कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यापूर्वीच राज्यातील सर्वच आमदारांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त कृषी विभागातील कर्मचारीही आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देणार आहेत.

ऊसाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु

दरम्यान, महापुरात शेतीचं तसंच ऊस शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम लांबण्याची चिन्हं होती. त्यावर कृषीमंत्री भरणे यांनी हंगाम कधीपासून सुरु होईल याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं की, "१ नोव्हेंबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होईल. हंगाम ठरवणाऱ्या कमिटीत कृषीमंत्री म्हणून मी देखील असून या कमिटीच्या तीन बैठकांना मी स्वतः उपस्थित होतो.

यामध्ये मुख्यमंत्र्यांनी साधारणतः १ नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरु करु असं सांगितलं. गेल्या वर्षी साधारणतः १५ ऑक्टोबर रोजी गळीत हंगामाला सुरुवात झाली होती. यंदा पूरामुळं अद्यापही ऊसाच्या शेतात पाणी साचलेलं असल्यानं तो १५ दिवसांनी उशीरा सुरु होत आहे, असं स्पष्टीकरण यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT