Food and Drug Administration officials under scrutiny as minister Narhari Zirwal orders investigation into Assistant Commissioner Ulhas Ingwale over alleged corruption and pesticide testing controversy. Sarkarnama
महाराष्ट्र

Narhari Zirwal : मंत्रालयात 15 वर्षांपासून खुर्ची टाकून बसलेला बडा अधिकारी नरहरी झिरवाळांच्या रडारवर : प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Mumbai FDA News : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त उल्हास इंगवले यांच्यावरील भ्रष्टाचार आणि कीटकनाशक प्रकरणाच्या आरोपांवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी चौकशीचे आदेश दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

महेश जगताप

Mumbai News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग वादग्रस्त ठरत आहे. त्याचवेळी गेल्या 15 वर्षांपासून याच विभागात ठाण मांडून बसलेले विद्यमान सहाय्यक आयुक्त उल्हास इंगवले यांच्या विविध कारनाम्यांमुळे या विभागातील गैरप्रकार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

2023 मध्ये एका चहा नमुन्यांमध्ये घातक पेस्टीसाईड सापडले असतांना 90 लाखांचा भ्रष्टाचार करुन त्यांना क्लीनचीट देवून जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण केलेला आहे, असा ठपका विधिमंडळातील अनेक आमदारांनी ठेवला होता.

अन्न व प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनीही इंगवले या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करून चौकशी करण्याचे निर्देश सचिवांना यापूर्वीच दिले होते. यामुळे अन्न व प्रशासन विभागामध्ये मंत्र्याविरुद्ध अधिकारी असा वाद असल्याचीही चर्चा प्रशासकीय वर्तुळामध्ये रंगत आहे.

सप्टेंबर 2024 च्या दरम्यान एका चहामध्ये मोनोक्रोटोफॉस या किटकनाशकाचा अंश सापडला असता, त्या अनुषंगे अन्न विभागाच्या  गुप्तवार्ता विभागाने राज्यभर चहाचे वितरक यांच्यावर धाडी घातल्या. सदर चहाचे नमुने विशिष्ट खाजगी लॅबला पाठवण्यासाठी सहाय्यक आयुक्त गुप्तवार्ता इंगवले यांनी स्वतः अथवा अधिनस्थ अधिकाऱ्यांमार्फत आदेशीत करून सदर खाजगी प्रयोग शाळेची कीटकनाशके तपासण्याची मशीन बंद असल्याबाबत अभिप्राय प्राप्त देण्यास भाग पाडणे.

त्यामुळे लाखो रुपयांचा चहाचा माल सोडून देण्यास भाग पडणे या सर्व प्रकरणात इंगवले यांनी गैरप्रकार करून करोडो रुपये मिळवले असण्याची चर्चा असणे, त्यामुळे इंगवले यांना पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी जबाबदार धरून इंगवले यांना प्रशासनाने निलंबितही केलेल आहे. तरी आजही अन्न विभागाचे गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. यावर विधिमंडळातील अनेक आमदारांनी विरोध नोंदवला आहे.

महाराष्ट्र विधानसभेत इंगवले यांचा मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार काढण्यात यावा असे निर्देश दिलेले असतांना देखील 24/12/2025 रोजी तत्कालीन आयुक्तांच्या  मान्यतेने पुन्हा इंगवले यांना सह आयुक्त मुख्यालय, पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश देण्यात आली आहे. याबाबत आमदार श्वेता महाले, अमोल मिटकरी, संतोष बांगर, विक्रम पाचपुते यांनी याआधीही विधिमंडळामध्ये आवाज उठवला आहे. तरीही या अधिकाऱ्याची खुर्ची हलवण्याची ताकद कोणामध्येच नसल्याचे दिसत आहे.

2007 सालापासून इंगवले यांनी अन्न निरीक्षक म्हणून कामाला सुरवात केली. मुंबई व आसपास तथा कायम मुख्यालयातच पदस्थापना घेतल्याचे दिसून येते. यातूनच ते अन्न विभागाचे प्रशासन एकहाती चालवत असल्याची माहिती आहे. आमदारांकडून सदर बाबतीत मोठ्या प्रमाणावर विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून इंगवलेवर कारवाई करण्याबाबत विभागाच्या मंत्री महोदय यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले परंतु अजूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

इंगवले यांच्यावर आमदार व मंत्र्यांकडून होत असलेले आरोप

१) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

२) गुटखा चालकांना मोकळीक

३) मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

४) अवैद्य धंद्यांना खतपाणी

५) प्रशासनात मनमर्जी

मी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून उल्हास इंगवले या अधिकाऱ्याविरुद्ध प्रत्येक अधिवेशनात लोकप्रतिनिधींमार्फत प्रश्न उपस्थित होतात. तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे वैयक्तिक ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या अधिकाऱ्याची कार्यपद्धती ही संशयास्पद असून त्यांची चौकशी करण्याचे निर्देश सचिवांना यापूर्वीच देण्यात आलेले आहेत.

- नरहरी झिरवळ ( अन्न व औषध विभागाचे मंत्री)

माझ्यावर झालेले आरोप निराधार आहेत. मी कोणत्याही चौकशी सामोरे जाण्यास तयार आहे. मला मॅटने माझी विविध प्रकरणावर निर्दोष मुक्तता केली आहे. अहिल्यानगर भागातील काही अधिकारी राज्यातील आमदारांना व विभागाच्या मंत्र्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत.

- उल्हास विनायकराव इंगवले सहायक आयुक्त ( अन्न गुप्तवार्ता अन्न व औषध प्रशासन मुख्यालय मुंबई  )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT