Maharashtra Free Seeds Scheme sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दुबार पेरणीच्या खर्चाबाबत सरकारची मोठी घोषणा : बोगस बियाण्यांनी फटका बसलेल्यांना दिलासा

Maharashtra Free Seeds Scheme, Duplicate Seeds, Devendra Fadnavis: बोगस बियाणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना डीपीडीसी निधीतून मोफत बियाणे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतल्याची घोषणा करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Free Seeds Scheme: राज्यात बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्यास, आता त्यांना स्वतःच्या खर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही. अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या (डीपीडीसी) निधीतून मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कृषी, शेतरस्ते, आदिवासी विकास आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारच्या इतर विविध निर्णयांचीही माहिती दिली.

सध्या राज्यात अनेक ठिकाणी, विशेषतः अमरावती, अकोला, नागपूर आणि इतर भागात वितरकांनी बोगस बियाणे दिल्यामुळे सोयाबीन किंवा कापसाचे पीक उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता.

साधारणपणे पीक पेरणीनंतर ते न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट कोसळते. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडू नये, म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आता संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील डीपीडीसी निधीतून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी आवश्यक असणारा निधी व मोफत बियाणे उपलब्ध करून देतील, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT