Maharashtra drought relief Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Drought Relief : राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप 5 हजार का मिळाले नाहीत? ही आहेत महत्वाची कारणे, जाणून घ्या...

Maharashtra Drought, Farmers Relief, Rs 5000 Farmer Assistance, Maharashtra Farmers : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. आता राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० झाली आहे.

Rajanand More

Drought Affected Farmers Update : राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असून आतापर्यंत ३१० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या तालुक्यांतील ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात येत आहे. मात्र, अजूनही लाखो शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येत आहेत.

मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ॲग्रीस्टॅक प्रणालीवर राज्यातील सुमारे १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यांना फार्मर आयडीही देण्यात आले आहेत. यापैकी सुमारे ९४ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. ही मदत शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२६ आणि पीक नुकसानीसाठी लागू असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार वितरित करण्यात येत आहे.

काय येतायेत अडचणी?

पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा केली जाते. आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे काही व्यवहार अयशस्वी झाले आहेत. तसेच वारस नोंदी, नावातील तफावत, प्रतिबंधित जमीन नोंदी आणि चुकीची अथवा विसंगत माहिती यामुळे काही फार्मर आयडींच्या पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत, अशी माहिती विभागाने दिली आहे. अशा प्रकरणांची छाननी करून निर्धारित निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जात असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

नव्याने समाविष्ट तालुक्यांनाही मदत

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून १४ ऑक्टोबर २०२६ रोजी ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आणखी सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० झाली आहे. या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निर्धारित निकषांनुसार मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे विभागाने सांगितले.

पीक नुकसानीचे क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या पात्र शेतकऱ्यांना निर्धारित निकषांनुसार मदत देण्यात येत आहे. मदत वितरणापूर्वी शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी, नोंदींचे प्रमाणीकरण आणि पात्रतेची तपासणी करण्यात येते. गेल्या १५ दिवसांत चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नव्याने फार्मर आयडी प्राप्त केले आहेत. या शेतकऱ्यांच्या नोंदींची निर्धारित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार त्यांचाही मदतीसाठी विचार केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT