मनोज जरांगे पाटील यांनी सरकार कोणाचे आले तर आम्हाला फरक नाही. मराठ्यांना आरक्षण हवे आहे. सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेऊ असे सांगताना या पुढे मुंबईतील आझाद मैदानावर सामुहिक उपोषण होऊ शकते, असा इशारा दिला आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावाहून ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. शिंदे हे ठाण्यात दाखल होताच दीपक केसरकर त्यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. महायुतीची बैठक होणार होती. ती बैठक आजच होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने केसरकर शिंदेंच्या भेटीला दाखल झाल्याची चर्चा
शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. उपचारादरम्यान उपसरपंचाचा मृत्यू झाला. दत्तात्रय गिलबिले असे प्राणघातक हल्ल्यात मृत्यु झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने दत्तात्रय जखमी झाले होते. त्यांना पुण्यातील रुग्नालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असुन हल्लेखोरांचा शिक्रापुर पोलिसांकडून शोध सुरु
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे या गावातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असं स्पष्ट केलं आहे. शिवाय मी मुख्यमंत्री नाही तर कॉमनमॅन आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे फुटले नसते तर आता सर्वाधिक बहुमत युतीला मिळालं असतं असं वक्तव्य भाजप नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे त्यावेळी फुटले नसते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं, असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. ते म्हणाले, भाजप शिवसेना एकत्र राहिली असती तर यापेक्षा जास्त बहुमत मिळालं असतं. उद्धव ठाकरे यांची वाट भरकटवली, असा टोलाही त्यांनी लगावला.
जे निकाल लागले आहेत ते अनपेक्षित होते, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, "मी 7 सार्वत्रिक निवडणुका लढलो आहे. कार्यकर्त्यांना अंदाज येत असतो. लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. बाबा आढाव यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी मुंबईहून येथे."
शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे.घरात बसणाऱ्यांना लोकांनी मतं दिली नाहीत असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला आहे. तसंच महायुतीच्या शपथविधीसाठी विरोधकांना घाई करण्याचे कारण नाही. चिंता करू नका, आम्ही त्यांना निमंत्रण पाठवणार आहोत. नयनरम्य सुख देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2019 ला शपथविधीला एक महिन्याचा कालावधी का लागला? असा सवाल करत अडीच वर्ष सत्ता चालवली हे लोकांनी पाहिलं म्हणूनच त्यांनी आम्हाला भरभरून मतं दिल्याचंही शिरसाट यावेळी म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे राऊत पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहत. तर या भेटीत फेरमतमोजणीवर चर्चा करणार असल्याची माहिती.
देशाचे माजी सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी घटनाबाह्य कामं करुन देशात आग लावल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाचं संरक्षण होतं. राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य आहे. निकाल लागून 10 दिवस झाले तरीही अजून सरकार स्थापनेचा दावा नाही, असंही ते म्हणाले.
महायुतीत काही मंत्रिपदांवर तोडगा निघत नसल्यामुळे एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील हेदेखील आज जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत.यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं जनतेला वाटणं स्वाभाविक असल्याचं वक्तव्य केलं.
महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या अधिवेशनात प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिले ते कमी दिवसांचे असणार आहे. शिवाय या अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेता नसणार आहे. तर अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या वाढीव रकमेवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काळाजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सध्या साताऱ्यातील दरे या गावात आहेत. काल त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. अशातच आज दुपारी ते ठाण्याला येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे पुन्हा भेटीगाठी सुरू करणार की आराम करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ईडीने समन्स बजावलं आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात छापेमारीनंतर हे समन्स बजावलं असून त्याला सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. दोन दिवसापूर्वीच राज कुंद्रा याच्याशी सबंधित अनेक ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती.
काँग्रेसचे जेष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दुपारी बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील आढाव यांच्या घरी जाऊन ते भेट घेणार आहेत. आढाव यांनी मागील 3 दिवसांपासून पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते शरद पवार, ठाकरेसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आढाव यांची आंदोलन स्थळी भेट घेतली होती.
5 डिसेंबरला PM मोदींच्या उपस्थितीत आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.