Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Love Jihad : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशीच 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय

Love Jihad Maharashtra government committee Devendra Fadnavis : लव्ह जिहाद विषयी सरकारने स्थापन केलेल्या समितीमुळे महायुती सरकार आरएसएसचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप या समितीवर होण्याची शक्यता आहे.

Rajesh Charpe

Love Jihad Law : लव्ह जिहाद आणि त्या माध्यमातून होणारे धर्मांतरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलामार्फत या घटनेचा सातत्नेया विरोध केला जात आहे. या घटना रोखण्यासाठी आता महाराष्ट्रातील महायुती सरकारने पुढाकार घेतला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे‘चा मुहूर्त साधून राज्याच्या गृह विभागामच्या वतीने लव्ह जिहाद, बलपूर्वक होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी एक विशेष समितीची स्थापना केली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी व आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गृह खात्याच्या वतीने समिती स्थापन करण्याचा शासनादेश काढला आहे. गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे असल्याने त्यांच्याच देखरेखीत लव्ह जिहाद विरोधात कायदा तयार होणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी पोलिस महासंचालक तर सदस्य म्हणून महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, विधि व न्याय विभागाचे सचिव याशिवाय गृह विभागाच्या सहसचिवाचा समावेश करण्यात आला आहे.

बलपूर्वक होणारे धर्मांतरण, लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदेशीर बाबींचा अभ्यास या समितीमार्फत करण्यात येणार आहे. काही राज्यांनी केलेल्या या संदर्भात केलेल्या कायद्याचाही विचार करण्याच्या सूचना या समितीला करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. हे बघता महायुती सरकार आरएसएसचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप या समितीवर होण्याची शक्यता आहे. भाजपने आपल्या सर्व मंत्र्यांकडे स्वतंत्रपणे स्वीय सहायक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या स्वयंसेवकांना सहायक म्हणून नेमल्या जाणार असल्याची चर्चा आहे.

सरकार व सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचाव्या तसेच कार्यकर्त्यांमार्फत जनतेले दिलेली आश्वासने पूर्ण करता यावी याकरिता सहायक नेमले जात असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. पथ अंतोदय हे संघाचे धोरण आहे. त्यांचाही धोरणाची या माध्यमातून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार भाजपने अनुसुचित जामातीकडे विशेष लक्ष देणे सुरू आहे. त्यांचे मेळावे व बैठका घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक मंत्र्यांना एका गावांमध्ये मुक्काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT