Maharashtra recruitment Exam Complaints Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Recruitment: भरती परीक्षांवर विद्यार्थ्यांचा संताप! 4,500 तक्रारींनंतर सरकार घेणार मोठा निर्णय?

Maharashtra Recruitment Exam Complaints: स्पर्धा परीक्षांबाबत सातत्याने तक्रारी वाढत आहेत. यामध्ये पेपर फुटी पासून तर परीक्षा आणि निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य परीक्षा आयोग आणि पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले जात आहेत.

Sampat Devgire
  1. भरती परीक्षांबाबत नाशिकच्या विद्यार्थ्यांकडून तब्बल ४,५०० तक्रारी आणि अभिप्राय शासनाला प्राप्त झाले आहेत.

  2. पेपरफुटीपासून परीक्षा व निवड प्रक्रियेपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत.

  3. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शासनाची उच्चस्तरीय समिती ३० सप्टेंबरला नाशिकला भेट देणार आहे.

Nashik News:: राज्यातील विविध शासकीय भरती परीक्षा सातत्याने वादाचा विषय ठरत आहेत. त्यामुळे परीक्षा आयोग आणि सरकारवर युवकांचा विश्वास उडाला आहे. यात सुधारणा करण्यासाठी पावले टाकली जात आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पर्धा परीक्षा विषयी आक्षेप घेतले होते. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही मोठ्या प्रमाणावर सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य शासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पार्श्वभूमीवर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी भरती परीक्षा बाबत साडेचार हजार सुधारणा आणि अभिप्राय कळविले आहेत. या संदर्भात शासनाची समिती येत्या 30 सप्टेंबरला नाशिकला भेट देणार आहे. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी याबाबत माहिती दिली.

स्पर्धा परीक्षांबाबत सातत्याने तक्रारी वाढत आहेत. यामध्ये पेपर फुटी पासून तर परीक्षा आणि निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य परीक्षा आयोग आणि पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले जात आहेत.

सध्या जेन जी या विषयावर आक्रमक आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या यंत्रणा नाही घाम फुटला आहे. उच्च पार्श्वभूमीवर सातत्याने होणारी टीका राज्य सरकारला अडचणीत आणत असल्याचे चित्र आहे.

राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा बाबत सातत्याने नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यासह राज्याच्या विविध भागात सरकारविरुद्ध आंदोलन झाले. त्यामुळे याबाबत उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT