Elections News: जुलै महिन्यात राज्यातील 15 हजार निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता होती. मात्र, नव्या माहितीनुसार निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. या विषयी एका मराठी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
तब्बल 15 हजार 623 ग्रामपंचयीतींचे निवडणूक लांबणीवर पडणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी ही निवडणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी 2027 उजाडणार आहे. राज्यात सुरू असलेले मतदारयादी पडताळणी ( एसआयआर) मुळे निवडणुक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे.
2024,2025 आणि 2026 अशा तीन वर्षातील मुदत संपलेल्या 15 हजारहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक यंदा होण्याची शक्यता होती. निवडणुकीसाठी प्रभागरचना प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. आरक्षण प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली होती. याची अंतिम यादी देखील जाहिर होणार आहे. मात्र, राज्यातील एसआयआर प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यक्रमाला फटका बसणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी नवीन मतदारयादीचा वापर करावा लागणार आहे.
एसआयआनंतर तयारी होणारी नवी मतदारयादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्राह्य धरावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जात असल्याचे सांगितले जात आहे. एसआयआर प्रक्रियेत मतदारयादी सात ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
एसआयआरच्या मतदारयादी नंतर त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादीची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय निवडणूक यादी तयार होण्यासाठी दोन महिन्यांचा काळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादींना अंतिमरुप मिळण्यास डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.