उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी पुण्यात आदित्य चषक 2025 ही कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावलेल्या बॅनरवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो झळकला आहे. यामुळे सध्या परीसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण अजित पवार हे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सात दिवसानंतर अन्नत्याग आंदोलन घेतलं मागे घेतलं आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील 24 तास महत्त्वाचे असल्याचे डॉक्टर प्रफुल कडू यांची माहिती दिली आहे. कडू यांच्यासह 23 उपोषणकर्त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सध्या बच्चू कडू यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.
राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बौध्द व बहुजन समाजाच्या वतीने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. जलील यांनी छञपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषदेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याविषयी बोलताना'हरीजन'असा वारंवार उल्लेख केला होता. ज्यामुळे बौध्द व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटलं आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात दर महिन्याला एक घोटाळा उघडकीस येत होता. मात्र मागील 11 वर्षात मोदीजींच्या सरकारमध्ये असा घोटाळा उघडकीस आलेला नाही. केंद्रात किंवा राज्यात कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. ही वस्तुस्थिती असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सात दिवसानंतर अन्नत्याग आंदोलन घेतलं मागे घेतलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. ते आता मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थी मागे घेण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यावेळी सामंत यांनी 15 दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केलीय.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आपण एकटे पडलो असल्याचे भाष्य केलं होतं. त्यावर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ यांनी, सतेज पाटलांचं वक्तव्य वाचलं. हे सर्व जनरल निवडणुकीमध्ये ठीक आहे, असं बोलून त्यांना सहानुभूती मिळू शकेल. पण गोकुळ, विधान परिषदेच्या निवडणुकीत एकटा पडलोय असे म्हटलं की घोटाळा होतोय. बहुतेक त्यांचा पराभव होतोय म्हणून लोक जात नाहीत. सतेज पाटलांकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी लढायला पाहिजे आणि मी विजय होणार असे देखील सांगायला हवं. गोकुळचे मतदार ठराविक आहेत. पण ते फार हुशार आहेत. गोकुळ आणि विधान परिषदेला मी एकटा पडलोय असं म्हटल्यावर काही उपयोग होणार नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती. सर्वजण आपापले पक्ष घेऊन लढणारच असेही संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 150 पैकी 108 नगरसेवक निवडूण आले होते. आता भाजपने 130 नगरसेवकांचे टार्गेट ठेवले आहे. ही बाब सध्या तरी अवघड वाटत नसली तरी यासाठी एक मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. काँग्रेसच्या सुमारे 30 माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. यापैकी काही माजी नगरसेवक स्वतःच भाजपकडून लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. हे ऑपरेशन सक्सेस झाल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत, मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्या आधीच स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकत्र आल्याचं सांगलीत पाहायला मिळाले आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमिवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्रित असल्याचे पाहायला मिळाले आहे. येथे महाराष्ट्र राज लिहलेला केक शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्रित कापला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.