Raj Thackeray issues a strong warning against the imposition of Hindi in Maharashtra schools, citing linguistic identity concerns.  Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray Letter : ...तर माझे सैनिक तुमच्याकडे येतील! राज ठाकरेंचा ‘त्या’ शाळांना थेट निर्वाणीचा इशारा

Raj Thackeray Opposes Hindi Language Imposition : राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांना खुलं पत्र लिहित हिंदी भाषेची विद्यार्थ्यांवर सक्ती न करण्याचे आवाहन केले आहे.

Rajanand More

Raj Thackeray warning : राज्यातील शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याता आल्याचा दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र सरकारवर आसूड ओढले. एवढेच नाही तर आता ज्या शाळा सरकारच्या धोरणानुसार हिंदी भाषा सक्तीची करतील, त्यांच्याविरोधात त्यांनी दंड थोपटण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांना खुलं पत्र लिहित हिंदी भाषेची विद्यार्थ्यांवर सक्ती न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या पत्रामध्ये सरकारची भूमिका सांगताना शाळांनाही जणू निर्वाणीचा इशाराच दिला आहे. ज्या शाळा हिंदी भाषेची सक्ती करतील, तो महाराष्ट्र द्रोह समजला जाईल. अशा शाळांमध्ये माझे महाराष्ट्र सैनिक (चर्चेला) येतील, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे, अशी पत्राची सुरूवात करत ठाकरेंनी आतापर्यंतचा याबाबतची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की, पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार, असं दिसतंय. याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत, असेही ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.

तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला) येतील, असा सूचक इशारा ठाकरेंनी दिला आहे.  

या विषयांत जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही, याचं लेखी पत्र हवं असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की. महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे. बाकी आपण सुज्ञ आहातच, अधिक काय लिहीणे, असे म्हणत राज ठाकरेंनी पत्राचा शेवट केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT