Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या कुटुंबीयांची मुजोरी, पत्रकारावर फेकल्या चपल्या

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 19 March 2026 : अशोक खरात प्रकरणात एसआयटी स्थापना, अमेरिका-इराण युद्ध आणखी भडकणार, केंद्रीय मंत्रिमंडळाची विस्तार होण्याची चर्चा यासह राज्यभरासह देशविदेशातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर मिळवा.

सरकारनामा ब्यूरो

रुपाली चाकणकरांना नार्को टेस्ट करा - अंधारे

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या सर्व गुन्ह्यांची माहिती होती. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच चाकणकर यांनी तातडीने राजीनामा द्यावे, असे देखील त्यांनी म्हटले.

अशोक खरातच्या मध्यस्थीने सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

अनेक बडे सरकारी अधिकारी अशोक खरातच्या दरबारात जात होते, असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. चॉईस पोस्टिंगसाठी, बदलीसाठी हे अधिकारी खरातकडे जात होते, तसेच कामांच्या बदल्यात खरातला जमिनीत गुंतवणुकीच्या स्वरूपात ‘दक्षिणा’ दिली जात असल्याचीही चर्चा आहे.

रुपाली चाकणकरांची तात्कळ हकालपट्टी करा - अंजली दमानिया

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे, दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे चार फोटो शेअर करत अशा Epstein बाबांवर इतकी मेहेरबानी ? ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ? ह्या रुपाली चाकणकरांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा असे म्हटले आहे.

पावसाने शेतकरी अडचणीत, मदतीची मागणी

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते म्हणाले, नैसर्गिक संकट राज्यातील शेतकऱ्यांच्या कायमच पाचवीला पुजलं असून राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशीव, कोल्हापूर, अकोला, सांगली, अहिल्यानगर, परभणी, बुलढाणा, नाशिकसह इतरही जिल्ह्यात गहू, ज्वारी, कांदा, द्राक्ष, कलिंगडसह अन्य पिकांचं अतोनात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला गेल्याने शेतकरी हवालददिल झाला आहे. या सर्व नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, ही विनंती!

...तर महाराष्ट्रातील सरकार पडेल

अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्रातील एपिस्टीन फाईल प्रकरणापेक्षाही भयंकर प्रकरण आहेत. जर पोलिसांनी 58 व्हिडिओ समोर आणले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

रुपाली चाकणकर फरार

अशोक खरात प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणी होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली, अशी फेसबूकवर पोस्ट केली आहे.

आम्हाला डांबून ठेवलं, निकम यांचा दानवेंवर आरोप

अंबादास दानवे यांनी परस्पर आमचा सौदा केला. चार दिवस आम्हाला डांबून ठेवलं, आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही, की भाजपाशी हातमिळवणी केली नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला.

अशोक खरातच्या कुटुंबीयांची मुजोरी, पत्रकारावर फेकल्या चपल्या

अशोक खरात या अत्याचारी भोंदू बाबाच्या कुटुंबीयांनी मुजोरीची परिसीमा गाठली आहे. त्यांच्या आलिशान बंगल्यातून बाहेरील पत्रकारांवर चपलांचा मारा करत पत्रकारांना कुत्र्याचा धाक दाखवायचा प्रकार खरात कुटुंबीयांनी केला आहे, या विषयी ट्विट करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरात कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT