Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : सोन्याचा दराचा विस्फोट, तर चांदीचा भाव 'तुफान' असणार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज रविवार 01 मार्च रोजीच्या दिवसभरातील राज्य आणि देशभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

Gold And Silver Prices : सोन्याचा दराचा विस्फोट, तर चांदीचा भाव 'तुफान' असणार

इराण आणि इस्रायलदरम्यान सुरू झालेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर जात सुरक्षित पर्यायांकडे म्हणजेच, सोने आणि चांदीकडे वळत आहेत. याचा थेट परिणाम कमोडिटी आणि शेअर बाजारावर दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार कायम राहू शकतो. ज्यामुळे मौल्यवान धातूंना आधार मिळू शकतो. या घडामोडींमुळे जागतिक बाजारात ‘रिस्क-ऑफ’ भावना पसरली आहे. गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसा काढून सोने, चांदी आणि यूएस ट्रेझरीसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे वळत आहेत.

Thane Crime : नवख्या कलाकार युवतींना सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या दलाल अभिनेत्रीला अटक

दहा हजारांचे आमिष दाखवून टीव्ही मालिका तसेच माॅडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नवख्या कलाकार युवतींना सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या 27 वर्षीय दलाल अभिनेत्रीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी दिली. यावेळी दोन पीडित युवतींची सुटका करण्यात आली. त्यांना महिला गृहात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाकडून तिने 30 हजार रुपये घेतले होते. 20 हजार रुपये स्वत:कडे ठेवून दहा हजार रुपये पीडित युवतीला देण्याचे ठरले हाते. वर्षभरापासून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.

Yavatmal Update : यवतमाळचे पाच जण दुबईत अडकले, अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका

यवतमाळचे पाच जण दुबईत अडकले आहे. अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे दुबईमधील हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीला सायंकाळी दुबईत पोहचले, उद्या परतीच्या मार्गावर असतानाच फ्लाईट रद्द झाल्याचं समजलं. राजीव निलावार, राजू लोहाना, सतीश बनगीनवार, निखिल जिरापूर आणि श्याम पाटील दिग्रस, असे दुबईत अडकलेल्याची नावे आहेत.

Congress Harshwardhan Sapkal : कोकणात काँग्रेस संघटन मजबूत करणार; हर्षवर्धन सपकाळांचे संकेत

चिपळूणमधील शिबिरातून नेतृत्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिराने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल. आघाडीचे राजकारण ही अपरिहार्यता आहे. पण त्याचा कोकणात काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे. आगामी काळात कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच अनुषंगाने कोकण विभागात हे तीन दिवसाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता झाली.

Harshwardhan Sakpal Criticizes : 'कसबा इथल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला निधीची नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता'

संगमेश्वर तालुक्यातील कसबा इथं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे, तर राजकीय इच्छाशक्तीची कमतरता असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली. कसबा इथं भव्य व दिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी स्थानिक स्तरावर सातत्याने होत असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Kokan Update : कणकवली इथल्या मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर केवळ फार्स; वैभव नाईक यांचा गंभीर आरोप

कणकवली इथल्या मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ एक फार्स होता. तब्बल 1200 पेशंट उपचाराशिवाय का राहिले होते ? याची आधी चौकशी झाली पाहिजे.जिल्ह्यातील अनेक पेशंट गोव्यात रेफर केले जातात. फॅक्चर झालेल्या रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी 15 दिवस ताटकळत रहावे लागत आहे. औषधे उपलब्ध नाहीत, त्याकडे लक्ष देऊन सर्व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, मशिनरी, तंत्रज्ञ, औषधे उपलब्ध करा , तरच जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल, असे शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाचे कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

Dharashiv Crime News : धाराशिव हादरलं, चुलत्यानेच 13 महिन्यांच्या चिमुकलीचे कोयत्याने तुकडे करून पुरलं

धाराशिवमध्ये धक्कादायक घटना घडली असून, 13 महिन्यांच्या चिमुकलीचे चुलत्यानेच कोयत्याने तुकडे केले. धाराशिवच्या गवळेवाडी इथं ही धक्कादायक घटना घडली. मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची वडिलांनी तक्रार दिली होती. पोलिस तपासात चुलत्यानेच पळवून नेल्याचे समोर आले आहे. मुलगी भावाची नसल्याच्या संशयावरून हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

Gadchiroli Update : गडचिरोलीत दारूबंदी, तरी अवैध दारू विक्री, पोलिसांकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांना अवैधरीत्या छुप्यापद्धतीने दारू विक्री आणि वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मोहीम उघडून अवैध दारू विक्री करणा­ऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत तब्ब, 12 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Nagpur Accident : मृतदेहांची ओळख पटवणं झाले कठीण

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला. दरम्यान या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत या भीषण स्फोटत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील प्रत्येक मृत कामगाराची ओळख पाठविणे अवघड झाले आहे. त्यामुळे डीएनए प्रोफाइल चाचणी होणार आहे. ही प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

jaykumar gore : साताऱ्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या पक्षांकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. अद्याप अध्यक्षपदाची निवड झालेली नाही. अशातच मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापूरसह, सातारा, सांगली आणि धाराशिव या चारही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. साताऱ्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

Maharashtra government : पॉश ऑडिट करण्याचे आदेश

राज्यभरातील सर्व शासकीय, खाजगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार समितीचे परीक्षण (पॉश ऑडिट) एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहे. अनेक कार्यालयांमध्ये कायद्याचे पालन होत नसल्याने आयोगाने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले आहेत.

Amit Shah : अमित शाह नवी मुंबईत

नवी मुंबईत आयोजित 'हिंद दी चादर' या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत.

Iran Supreme Leader : सुप्रीम लीडर अराफी

अमेरिका-इस्त्राईलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांचा खात्मा झाला आहे. त्यानंतर इराणी धर्मगुरू अयातुल्लाह अलीरेजा अराफी यांना इराणचे अंतरिम सुप्रीम लीडर बनविण्यात आले आहे. ते आता अंतरिम नेतृत्व परिषदेत विधी विशेषज्ञ म्हणून काम करतील. कायद्यानुसार या समितीमध्ये राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि धर्मगुरू असतात.

Uttar Pradesh News : ४० दिवस दुखवटा

इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील काही भागात शिया समाजातील लोक रस्त्यावर उतरले. प्रामुख्याने अमेठीतील शिया धर्मगुरू मौलाना जिशान हैदर अली यांनी ४० दिवस दुखवटा पाळण्याचा संदेश दिला आहे. जिल्ह्यातील शियाबहुल भागात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

Iran Drone Attack कुवेत विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला, मोठं नुकसान

इराणच्या क्रांतिकारी रक्षक दलानं आता कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात विमानतळाच्या टर्मिनल -1 चे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात अनेक कर्मचारी जखमी झालेत. इराणनं आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या नागरी सुविधेला लक्ष्य केलंय.

Iran War Warning ..आता किंमत मोजा, इराणचा 'विनाशकारी' इशारा

अयातुल्ला अली खामेनींच्या निधनानंतर इराणच्या संसदेने अमेरिका आणि इस्रायलला शेवटचा इशारा दिलाय.. अध्यक्ष मोहम्मद बाघर कलिबाफ यांनी शत्रूंना "तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडली आहे, आता किंमत मोजावी लागेल" असं म्हटलंय.. "आम्ही असा विनाशकारी प्रहार करू की तुम्ही युद्ध थांबवण्यासाठी गयावया कराल," अशा कडक शब्दांत कलिबाफ यांनी प्रतिशोधाचा इशारा दिलाय...तर आता संपूर्ण जगात युद्धाची धास्ती निर्माण झालीये...

US warning Iran अमेरिकेवर हल्याचा विचार करु नका, ट्रम्प यांचा इराणला इशारा 

इराणच्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलाय. अमेरिकेवर तुम्ही हल्ल्यांचा विचार पण करू नका, नाही तर विचारही केला नसेल असा हल्ला आम्ही करू, असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिलाय. इराणनं आमच्यावर हल्ला न करणं, हे त्यांच्यासाठी योग्य असेल असंही ते म्हणालेय...

नागपुरातील एसबीएल स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया अन् चौकशीचे आदेश

नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील राऊळगावं शिवारात SBL ENERGY कमर्शियल स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत अचानक स्फोट झाला. या घटनेत 18 जण जखमी आणि 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटलं आहे. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीसुद्धा प्रशासनाकडून स्फोटाची माहिती जाणून घेतल्यानंतर तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेत.

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ; दहावीचाही पेपर फुटला

अमरावतीत दहावीचे दोन पेपर बाहेर गेल्याची खळबळजनक घटना घडली असून पेपर फुटल्याचे बोलले जात आहे. कस्टडीतून इंग्रजी विषयाचे बाहेर गेल्याने अंजनगाव सुर्जी येथील गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून दोन कर्मचारी फरार आहेत.

नागपुरात भीषण दुर्घटना, एसबीएल कंपनीच्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये एसबीएल कंपनीत स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी कंपनीबाहेर आक्रोश करत संताप व्यक्त केला आहे.

होळीनिमित्त कोकणवासियांसाठी मुंबई-विजयदुर्ग रो रो सेवा सुरू

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आता मुंबई-विजयदुर्ग रो रो पॅक्स सेवा सुरू झालीय. यामुळे मुंबईतून तळकोकणात फक्त ६ तासात जाता येणार आहे. कोकणात जाण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेत यामुळे मोठी बचत होणार आहे.

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासांकडून ५ देशांसाठी २४x७ हेल्पलाईन जारी

भारत सरकारने तणाव निर्माण झालेल्या या देशांमधील दूतावासांचे हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून ते २४x७ सुरू असतील. येथे त्या त्या देशातील भारतीय लोकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तर त्या त्या देशांच्या परिस्थितीवर दूतावासाकडून नियमितपणे लक्ष ठेवण्यात यावे अशाही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

खामेनेईंचा मृत्यू, इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांचा मृत्यू झालाय. यानंतर आता इराणची सत्ता कोण सांभाळणार याकडे जगाचं लक्ष लागून राहिलंय. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.

मराठवाड्यातील तब्बल 100 पर्यटक अडकले आहेत. 

अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, भू-राजकीय तणाव वाढला आहे. दरम्यान, एअर इंडियाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे व्यापक हवाई निर्बंध आणि उड्डाणांचे मार्ग बदलल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. याचा भारत आणि उत्तर अमेरिका आणि युरोपमधील लांब पल्ल्याच्या मार्गांवर लक्षणीय परिणाम झाला आहे.

खामेनी यांच्या हत्येच्या निषेधासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी श्रीनगरमधील मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने करायला सुरूवात केली आहे.

पार्थ आणि जय पवारांकडून बारामतीतील विकासकामांची पाहणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमाणाचे त्यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार यांनी आज पहाटे बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना भेट देत कामांची प्रगती तपासली.

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील 200 लोकांचा मृत्यू

Israel Iran US War : अमेरिका-इस्रायलने इराण केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत इराणमध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात 85 शाळकरी मुलींचाही समावेश आहे.

अमेरिका-इस्त्रायच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्त्रायकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची खळबळजन माहिती समोर आली आहे. खामेनी यांच्या मृत्यूचा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT