Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना पुन्हा क्लिन चिट, अंजली दमानियांची लोकायुक्तांनी तक्रार फेटाळली

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज सोमवार 02 मार्च रोजीच्या दिवसभरातील राज्य आणि देशभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Munde : कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना पुन्हा क्लिन चिट, अंजली दमानियांची लोकायुक्तांनी तक्रार फेटाळली

कृषी घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला होता. या प्रकरणातून धनंजय मुंडेंना क्लिन चिट मिळाली होती. आता हायकोर्टापाठोपाठ आता लोकायुक्तांनी ही धनंजय मुंडे यांना दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या विरोधात निर्णय देऊ शकत नाही, असं म्हणत लोकायुक्तांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची तक्रार फेटाळली आहे.

Jalgaon Update : दुबईत अडकलेल्या नागरिकांशी मंत्री महाजन यांचा मोबाईलद्वारे संवाद

दुबईमध्ये अडकलेल्या धुळ्यातील नागरिकांशी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन द्वारे संवाद साधून तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली. दुबईमधील अनेक मोठ्या हॉटेलमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने, थांबलेल्या नागरिकांना हॉटेल सोडण्याबाबत सांगितलं जात आहे. यामुळे दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना जायचे कुठे हा प्रश्न पडला आहे. तणावाची परिस्थिती असल्याने विमान वाहतूक बंद असली, तरी राज्य सरकार व केंद्र सरकार हे नागरिकांच्या सोबत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना आश्वासन दिले.

Kalyan Crime : दीड हजारांची लाच; लाचखोर जेल कर्मचारी अडकले लाचेच्या जाळ्यात

कल्याण आधारवाडी जेल इथं कार्यरत असलेल्या दोन जेल कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पकडले. पथकाच्या या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शरद पानपाटील आणि सतीश भोसले, असे लाच घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. कारागृहातील बंदीला भेट घडवून आणण्यासाठी संबंधित कैद्याच्या नातेवाईकांकडे दीड हजाराची रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नातेवाईकांनी याबाबत अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. दीड हजाराची लाच स्वीकारताना दोन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले.

Share Market Crash : युद्धस्थितीमुळे शेअर बाजार धडाम! गुंतवणूकदारांचे 17.50 लाख कोटी रुपये बुडाले

पश्चिम आशियातील युद्धस्थिती वाढली आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. भारतीय शेअर बाजारात आज व्यवहारात सेन्सेक्समध्ये 1600 अंकांहून अधिक घसरण झाली, तर निफ्टी 500 अंकांनी कोसळत 34700 च्या खाली गेला. शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला आहे. गुंतवणूकदारांचे 17.50 लाख कोटी रुपये बुडाले आहे.

Iran Attack : भारतीय खलाश्याचा मृत्यू

इराणने केलेल्या हल्ल्यात एका तेलवाहू जहाजावरून भारतीय खलाश्याचा मृत्यू झाला आहे. ओमानमधील समुद्रामध्ये हे जहाज होते. इराणने या जहाजावर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला जात आहे.

 Tarapur MIDC : तारापूरमध्ये भीषण वायू गळती

पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे आज भागेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड (Bhageria Industries Limited) येथे कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम (Oleum) वायूची गळती झाली आहे. हा वायू वातावरणात पसरल्यामुळे काही ठिकाणी पांढऱ्या धुरासारखा / धुक्यासारखा दिसू शकतो. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विजय अग्रवाल

अकोला महापालिकेत महापौर-उपमहापौर पदानंतर भाजपने स्थायी समिती आणि इतर समित्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.‌ आज झालेल्या स्थायी समिती पदाच्या निवडणुकीत भाजपचे विजय अग्रवाल विजयी झालेत.‌

जालन्याचे खासदार कल्याण काळे हे दुबईमध्ये अडकले

जालन्याचे खासदार कल्याण काळे हे दुबईमध्ये तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत. ते सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळत असून ते 27 फेब्रुवारीला कुटुंबीयांसोबत दुबईला गेले होते. दरम्यान जिल्ह्यातील 8 जन दुबईमध्ये अडकल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे.

नागपूर कारखान्यातील स्फोट : जोपर्यंत युनिट बंद राहील, तोपर्यंत सर्व कामगारांना त्यांचे पगार मिळत राहतील -बावनकुळे

नागपूर कारखान्यातील स्फोट प्रकरणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “कंपनीने आम्हाला कळवले आहे की जोपर्यंत युनिट बंद राहील, तोपर्यंत सर्व कामगारांना त्यांचे पगार मिळत राहतील, मग ते दोन महिने असोत किंवा तीन महिने... सर्व सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित केल्यानंतर आणि जिल्हा प्रशासन आणि एसपींकडून संपूर्ण तपासणी केल्यानंतरच कंपनी पुन्हा काम सुरू करेल.”

मोबाईल फोन न घेतला १३ वर्षीय चिमुरड्याचा बळी

मोबाईल वापरण्यास का दिला नाही म्हणून १३ वर्षाच्या मुलाने राहत्या घरी साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१ मार्च रोजी सांय. ७ वा पुर्वी मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे घडली. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पर्यटनासाठी दुबईत गेलेले उमरगा येथील दोन जोडपे युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकले

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी दुबईला गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत. दुबईमध्ये सध्या निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. यामुळे यांना परतीचा प्रवास करता आलेला नाही

दुबईतील युद्धजन्य परिस्थितीचा लाईव्ह थरार! दुबईतील ग्राऊंड रिपोर्ट

मुंबईमधून धक्कादायक प्रकार; आठवीतील विद्यार्थ्याची मित्रांकडून हत्या

मुंबईतील भांडूप परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच्याच मित्रांनी जीव घेतल्याचे समोर आले. सुरुवातीला तलावात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी तिघा मित्रांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम; जळगावात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार

अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सोने बाजारात रविवारी सोन्याचे दर तब्बल १२ हजार रुपयांनी, तर चांदीचे दर सुमारे २३ हजार रुपयांनी वाढले होते. मात्र सोमवारी बाजार उघडताच सोन्याचा दर सुमारे १००० रुपयांनी घसरला. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून जागतिक घडामोडींचा थेट परिणाम बाजारावर दिसत आहे.

भाजपविरोधी मोठा चेहरा राज्यसभेच्या रिंगणात?

बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. चार जागांवर एनडीएचे उमेदवार सहज विजयी होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र पाचव्या जागेसाठी इंडिया आघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते म्हणून ते राज्यसभेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

J M Waghmare passes away : माजी खासदार, कुलगुरू डॉ. जे. एम. वाघमारे यांचे निधन

माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले.

 हवाई वाहतूक बंद झाल्याने जळगावचे 31 जण दुबईत अडकले

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे दुबईतील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तर जळगाव शहरातील 31 जण दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फडणवीसांकडून पुणे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अवघी 93 कोटी रुपयांची वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहे. फडणवीस आणि ही जबाबदारी स्वीकारताच पुणे जिल्ह्याला 2026-27 च्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अवघी 93 कोटी रुपयांची वाढ मिळाली आहे. गेल्या वर्षी अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनी 123 कोटी रुपयांची वाढ दिली होती. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी हा पहिला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. जिल्हा नियोजन समितीने मुख्यमंत्र्यांकडे 700 कोटींची वाढ मागितली होती आणि अवघी 93 कोटींची वाढ मिळाली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा आहे. तर याच आठवड्यात 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

भाजप पाठोपाठ आता काँग्रेसचाही स्वीकृत नगरसेवकाबाबत मोठा निर्णय

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकाबाबत प्रदेश काँग्रेसने यंदा निवडणूक लढलेल्या एकाही उमेदवाराला स्वीकृत म्हणून संधी देण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे.. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीचा निर्णय भाजपकडून देखील घेण्यात आला होता.

Taliban Pakistan Conflict : अफगाणिस्तानचा पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हवाई हल्ला

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा वणवा भडकला असतानाच आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही युद्ध सुरू झालं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या क्षेत्रात केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून अफगाणिस्तानातील तालिबानी प्रशासनाने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, तालिबानी हवाई दलाने रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस, क्वेटा येथील 12 वी तुकडी, खैबर पख्तूनख्वा येथील मोहम्मद एजेन्सीसह घलानी येथील सैन्य तळांना टार्गेट केलं आहे.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड 18 मार्चला

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक 18 मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणत्या तालुक्याच्या गळात पडणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक रविवारी पार पडली.

भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांचा अवमान

भाजप महिला पदाधिकाऱ्या असलेल्या प्रतिभा जाधव यांच्या मुलीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधव ही प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. मृणाल हिच्या विरोधात बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इराण-इस्त्रायल युद्धाने पुणे पोलिस दक्ष, संवेदनशील भागांवर लक्ष

अमेरिका इस्राएल - इराण मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस दक्ष झाले आहे. पुण्यातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष आहे. पुणे शहरातील धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अनेक इराणी विद्यार्थ्यांशी पुणे पोलिस संपर्कात आहेत. तसेच व्हिसाची मुदत संपत असल्यास इराणी विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT