Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live Marathi Breaking News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत होत असलेल्या सीआयआयच्या वार्षिक बिझनेस समिटला उपस्थित राहणार आहेत, यासह आज सोमवार दिनांक ११ मे रोजीच्या दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय अपडेट्स जाणून घेऊ या.

सरकारनामा ब्यूरो

PM मोदींनी देशात काटकसरीचा संदेश दिल्यानंतर राजकारण तापलं; नाना पटोलांची टीका 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काटकसरीचा संदेश दिल्यानंतर आता या मुद्द्यावर राजकारण तापू लागलं आहे.

- काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून शासकीय खर्चावर लगाम घालण्याची मागणी केली आहे…

- शासकीय दौऱ्यांमध्ये अनावश्यक खर्च टाळावा… चार्टर विमानांचा वापर मर्यादित करावा… तसेच मोठ्या वाहनताफ्यांनाही आळा घालावा…

- इंधन दरवाढ आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारनेच साधेपणाचा आदर्श ठेवणं गरजेचं असल्याचं पत्रात म्हटलं...

- सामान्य नागरिकांना काटकसरीचा संदेश देताना लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याच तत्त्वांचा अवलंब करावा, अशी जनतेची अपेक्षा असल्याचं पटोले यांनी पत्रात उल्लेख केला..

मुंबई शहरात येत्या 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात

मुंबई शहरात येत्या १५ मेपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. जलाशयातील पाणीसाठा घटत असल्याने महापालिका प्रशासनाने खरबदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात ठाकरे सेनेचे आंदोलन

सोलापूर शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. एक दिवस पाणीपुरवठा करून वर्षभराची पाणीपट्टी वसूल करणाऱ्या भाजपच सरकारचा निषेध, गढूळ पाणीपुरवठा करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध, अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

शिवसेनेच्या नगराध्यक्षांचा अवघ्या चार दिवसांत तडकाफडकी राजीनामा

रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगराध्यक्ष शाहिद जंजिरकर यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. ते चारच दिवसांपूर्वी म्हसळा नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. मात्र त्यांनी आज नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण स्वखुशीने हा राजीनामा दिला आहे, कोणाच्याही दबावाखाली हा राजीनामा दिलेला नाही, असेही शाहीद जंजिरकर यांनी स्पष्ट केले.

२७ जातींबाबत ओबीसी लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाला पत्र लिहिणार

महाराष्ट्रातील २७ जातीच्या नागरिकांना ओबीसीचा लाभ मिळवून देण्यासाठी मी उद्या केंद्रीय समाजिक न्याय मंत्रालयाला पत्र लिहिणार आहे, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक : संजय शिरसाट

नाशिक येथील टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान ही एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक आहे. या प्रकरणात एमआयएमचा एक नगरसेवक अटकेत आहे, जलील यांची ती नातेवाईक आहे. निदा खान ही पेड वर्कर आणि अशा अनेक निदा खान महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक न्याय विकास मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे.

TCS Report : 50 पानांचा धक्कादायक अहवाल समोर

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बीपीओ युनिटमधील कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाशी संबंधित आहे. या प्रकरणासंदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. नाशिक टीसीएस प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) चा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नाशिक प्रकरणाची दखल घेत 50 पानांहून अधिकचा अहवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.

Sunetra Pawar : DCM सुनेत्रा पवारांवर जेसीबीतून पृष्पवृष्टी

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचं स्वागत केलय तसेच रोहा शहरात त्यांचं जेसीबीतून पृष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलयं. त्यानंतर त्यांनी रोहा शहरात विविध विकासकामांचं उद्धाटन केलंय. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा आहे.

बोईसरमध्येअतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणाव

बोईसर शहरात मुख्य बाजारपेठेत फूटपाथवर असलेल्या अतिक्रमणांवर बोईसर ग्रामपंचायतची धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यातआले. दरम्यान, अतिक्रमण हटवताना फेरीवाल्यांची मुजोरीमुळे तणाव निर्माण झाला होता.

सुवेंदू अधिकारींच्या पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींना पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष पथकाने बिहार आणि उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील कुंडलिका नदीकिनारी पूर संरक्षण भिंत, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन, खाऊ गल्ली विकसित करणे, जे जे स्कूल ऑफ आर्ट ने तयार केलेल्या शिवसृष्टी शिल्प लोकार्पण अशी अनेक कामांचे भूमिपूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे

देवस्थानच्या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या होणार

देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकरी आणि पुजाऱ्यांना मोठा दिलासा 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन' कायद्याद्वारे मिळणार आहे. या कायद्याने ते कसत असलेली जमीन त्यांच्या मालकीची होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक मांडले जाणार आहे. त्यामुळे तब्बल साडेचार लाख हेक्टरहून अधिक जमीन मुक्त केली जाणार आहे.

खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते - चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एसआयटी चौकशीसाठी काल बोलवाण्यात आलं होतं. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी तब्बल 6 तास चाकणकरांची चौकशी केली. यावेळी खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर होत असलेल्या आरोपांबाबत त्यांना सविस्तर विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी रुपाली चाकणकरांनी माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते, असं एसआयटीसमोर मान्य केलं आहे.

नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला न्यायालयात हजर केले जाणार

नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला न्यायालयात हजर केले जाणार. पोलीस कोठडी वाढ होण्याची शक्यता.

TCS कंपनी प्रकरणातील आरोपींचा जामिनासाठी अर्ज

TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, यामध्ये निदा खानने जामिनासाठी अर्ज केला नसल्याचं समोर आलं आहे. निदा शेख वगळता दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, असिफ अन्सारी, अश्विनी चेनानी यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

सुषमा अंधारे आज विधानमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर होणार

सुषमा अंधारे आज विधानमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर होणार आहेत. दुपारी २ वाजता ही सुनावणी पार पडणार असून, अंधारे यांच्यावर असलेल्या हक्कभंग प्रस्तावा प्रकरणी त्या काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी हक्कभंग समितीने अंधारे यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. मात्र, त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. आज होणाऱ्या सुनावणीसाठी त्या पूर्ण तयारीनिशी मुंबईत दाखल झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते रोहा शहरातील 16 कोटी 32 लाख रूपयांच्या विकास कामांच भुमीपुजन केलं जाणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

CM फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत होत असलेल्या सीआयआयच्या वार्षिक बिझनेस समिट २०२६ ला उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT