मुंबई महापालिकेतील सोमवारी स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली.यावेळी सभेच्या सुरुवातीपासूनच आक्रमक झालेल्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. या गोंधळातच सभागृहात स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेता म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
इंदापूर येथे २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलनात एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या ८ गुन्ह्यापैकी ३ गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह सतिश काकडे , सदाभाऊ खोत , निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सरकारी सदनिका बेकायदा मिळवल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. त्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अंतरीम जामीन मिळवला होता. जामिनाची मुदत संपत आल्याने पुढील जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी आता एक आठवडा पुढे ढकल्यात आली आहे. कोकाटेंनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वनमंत्री गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. गणेश नाईकांनी स्वगृही आलं पाहिजे.. असं राऊतांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक वाद रंगला आहे. त्यावरून राऊतांनी नाईकांना ही ऑफर दिली आहे.
सोलापुरात दोन्ही राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अभिजीत पाटलांवर गद्दारीचा आरोप करण्यात आला आहे. पाटलांनी भगीरथी भालके यांच्या पॅनलला मदत केल्याचा दावा. पराभूत उमेदवाराचे पती दीपक भोसलेंनी केलाय. या प्रकरणी शशिकांत शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय..
शासकीय सदनिका बेकायदेशीररीत्या मिळवल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. त्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अंतरीम जामीन मिळवला होता. जामिनाची मुदत संपत आल्याने पुढील जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला राजस्थानमधील बहादूरगड येथून अटक करण्यात आली. त्याच्यासह आणखी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई क्राईम ब्रांच आणि स्थानिक स्पेशल टास्क फोर्सच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई झाली असून आरोपींकडून मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर सत्ता वाटपाचा मुद्दा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शिवसेनेकडून भाजपसमोर अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अन्न व औषध पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालायता लाच घेताना लिपीकाला अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर झिरवळ हे आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटणार आहेत.
मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेला लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांच्या नाशिकरोड येथील घराची झडती घेण्यात आली. एसीबीकडून झडती दरम्यान महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली आहे. ढेरिंगे मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे प्रतिनियुक्तीवर आला होता.
राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषद आमदार लंडन दौऱ्यावर गेले आल्याची माहिती समोर आली आहे. हा अभ्यास दौरा १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये सत्ताधारी आमदारांसोबतच विरोधी पक्षातील आमदार देखील हातात हात घालून दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. विधानसभा आणि विधान परिषद यातील मिळून एकूण 15 आमदार अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाल्या असून 22 फेब्रुवारीला हे आमदार परत फिरणार आहेत.
पुणे महापालिकेच्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला निवडणुकीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये पराभवाचा आत्मचिंतन करण्यात आले. बैठकीला शहरातील मनसे नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.राज ठाकरे यांनी सांगितलेल्या नियोजित गोष्टी पदाधिकाऱ्यांनी वेळेवर न केल्याने नाराजी ही व्यक्त केल्याचे सांगितलं जात आहे. तसेच आता इथून पुढे दर आठवड्याला आपण बैठका घेऊन आढावा घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज(सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसची आज कोअर कमिटी आणि आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणाबाबत तसेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचयातीचा कार्यकाळ संपत असताना प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती 20 फेब्रुवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तत्काळ निवडणुका किंवा तोपर्यंत प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करा. या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.