'छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचाही लढा ब्रिटिशांविरोधात होता. टिपू सुलतानला हरवण्यासाठी पेशवे कोणासोबत सामील झाले होते, हा इतिहास मुख्यमंत्र्यांनी वाचावा. अगदी रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेला इतिहास वाचला तरी चालेल, म्हणजे मुख्यमंत्री अशी चुकीची वक्तव्ये करणार नाहीत,' असे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
अजितदादांच्या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये अपघातानंतर मोठे स्फोट झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसते. विमान पडल्यानंतर काही वेळाच्या अंतराने स्फोट झाले. त्या विमानात अधिकचे इंधन होते. विमानाच्या पंखामध्ये आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते. यामुळे अपघातानंतर वारंवार स्फोट झाले, असा दावा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चार दिवसांपूर्वी अलिबाग इथल्या म्हात्रोळ गावात एका जमीन मोजणी प्रकरण चांगलच अंगलट आलं. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची चर्चा होती. खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर चर्चेत आलेत. नार्वेकर यांच्या कुटुंबाच्या नावावर चक्क 60 एकरहून अधिक जमीन अलिबागमध्ये असल्याचं उघडकीस आलं आहे. अलिबागमधील सोगाव, झिराड,किहीम, मांडवा, म्हात्रोळी , धोकवडे, मापगाव अलिबाग मांडवा रोड अशा भागात जमीन खरेदी केली आहे.
शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत का हे अजून निश्चित नाही. त्यामुळे आघाडीतील तीन पक्षांमध्ये ही एकमेव जागा कोण लढविणार हे अजून ठरायचे आहे. भाजप आपल्या निवृत्त होणाऱ्या विद्यमान तीन खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार की नाही हे अजून ठरायचे आहे.
राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या बरोबरीने सहा जागा निवडून येतील. महायुतीतील पक्षनिहाय संख्याबळ बघितले, तर भाजपचे चार आणि एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार शिवसेना यांचे प्रत्येकी एक खासदार निवडून येईल.
अमरावतीच्या कांतानगरमधील पाच न्यायाधीशांच्या आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याच्या प्रकरणी, चार पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चोरीची घटना घडली त्यावेळी दोन इमारतीमध्ये चार पोलिस कर्मचारी कार्यरत होते. पोलिस बंदोबस्त असताना न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान चार कर्मचाऱ्यांवर आता कारवाई झाल्याने पोलिस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अक्कलकोट ते कर्नाटक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाला रुंदीकरणासाठी 553 कोटींचा निधी मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमेवरील 47 किमी रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोट नगरीत येणाऱ्या स्वामी भक्तांच्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वाशिमच्या इथल्या मैनागिरी महाराज विद्यालयातील सामूहिक कॉपी प्रकरणी शिक्षण विभागाकडून 26 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आज होणाऱ्या रसायनशास्त्रच्या पेपरसाठी जिल्ह्यातील इतर 30 शिक्षकांची पर्वेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. भौतिक शास्त्राच्या पेपर दरम्यान 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केलाचा, अहवाल प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय ससाणे यांनी दिला होता. त्यानंतर काल या प्रकरणी केंद्रावरील 26 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले होते.
सोलापूर जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकानंतर मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार व आमदारांनी शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घेत चर्चा केली. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल मुंबईत, तर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनीही मंत्री उदय सामंत व भरत गोगावले यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंडिया AI इम्पॅक्ट समिटसाठी आमंत्रण दिलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती राहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत.
मी राजकारणात, समाजकारणात येण्याच्या आधीपासूनच्या आठवणी आहेत. माझ्यासाठी अजितदादा म्हणजे राजकारणावर विश्वास बसावा याचं प्रमुख कारण होते. मी शिवस्वराज्य यात्रा काढली तेव्हा खूप व्यक्तिगत गोष्टी सांगणारे, अनुभव सांगणारे असे दादा मी पाहिलेत, अनुभवले आहेत. आमच्या पक्षाचे दोन भाग झाले तेव्हाही आमच्या चर्चा झाल्या होत्या. आज ते नसताना त्यांची उणीव जाणवतेय, अशा शब्दात कोल्हेंनी अजितदादांची आठवणी सांगितल्या आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री जित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात आमदार रोहित पवार आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. धान लागवडीत शेतकऱ्यांवर येणाऱ्या आर्थिक तणावाबाबत या बैठकीत चर्चा झाली तर धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची मुनगंटीवार यांनी यावेळी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उद्या पुणे शहराती मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील मुख्य रस्त्यांवर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.