Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज शिवनेरी गडावर उपस्थित राहणार, यासह आज 19 फेब्रुवारी रोजीच्या राज्य आणि देशातील दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने मलेशियन दूतावासातील कर्मचाऱ्याची 78.85 लाखांची फसवणूक

क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने मलेशियन दूतावासात काम करणाऱ्या 41 वर्षीय भारतीय कर्मचाऱ्याची 78.85 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. वांद्रे येथील दुतावासात तो कार्यरत आहे. इन्स्टाग्रामवरून ‘EG Plan’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडून बनावट वेबसाइटद्वारे त्याच्याकडून ही गुंतवणूक करवून घेण्यात आली.

Sanjay Shirsat : गुन्हेगारांची बेकायदेशीर घरे पाडण्याचे पत्र दिल्यावर विरोध केल्याचा आरोप

मंत्री संजय शिरसाट यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाला कथितपणे समर्थन देत असल्याचा गंभीर आरोप केला. आयुक्तांनी ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगारांची बेकायदेशीर घरे पाडण्याचे पत्र दिल्यावर जलील यांनी याला विरोध केल्याने शिरसाट यांनी पोलिसांना या दिशेने तपास करण्याचे आवाहन केले आहे. शिरसाट यांनी संभाजीनगर पोलिसांना 45 नवीन वाहने दिल्याची माहिती दिली. यामुळे गुन्हेगारी शोधण्यास आणि आरोपींना पकडण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

Milind Narwekar : धोका टाळण्यासाठी सुचवले उपाय

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची प्रवाशांना प्रतीक्षा असून या मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांतील अंतर आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. सर्व प्रकारच्या तांत्रिक चाचण्या आणि अनुषंगिक कामे पूर्ण करून वाहतुकीसाठी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प खुला करावा, घाईघाईत हा प्रकल्प सुरू करू नये, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यामधील 87 ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला

नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.यात सर्वाधिक 27 ग्रामपंचायती शहादा तालुक्यातील, तर नंदुरबारमधील 22, अक्राणी 16, नवापूर 14, तळोदा 7 आणि अक्कलकुवा येथील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. प्रभाग रचनेसाठी गुगल अर्थच्या नकाशांचा वापर केला जाणार असून, 20 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

7 एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून 13 एप्रिलपर्यंत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या जातील. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाल्यानंतर, 4 मे 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. या घोषणेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जे काही घडेल ते उद्याच... भिवंडी प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया

भिवंडी प्रकरणावर भाजप चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलणे टाळल आहे…

रविंद्र चव्हाण म्हणाले जे काही घडेल ते उद्याच घडेल…

त्यावर आता बोलून काय होऊ शकत नाही… रवींद्र चव्हाण यांची सावध प्रतिक्रिया

Ahilyanagar Rahuri : पोलीस ठाण्याच्या आवारात शिवजयंती साजरी नोंदवला निषेध

अहिल्यानगर मधील राहुरी शहरात मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेची घटना घडली होती.. त्या घटनेला एक वर्ष झाले आहे तरीही पोलीसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही याचा निषेध करत आज (ता. 19) सर्वपक्षीय शिवप्रेमींनी शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी न करता थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर शिवजयंती साजरी करत प्रशासनाचा निषेध केला.

Bharat Gogavale : देवाच्या मनात आल्यावर... काय म्हणाले भरत गोगावले?

शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री भरत गोगावले महाडच्या छबिना उत्सवादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाही.

वीरेश्वर महाराजांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी साकड घातल्याच गोगावले म्हणाले आहेत. गेली पाच वर्षे झाली पालक मंत्री पद हुलकावणी देत असताना देखील गोगावले यांच्या आशावादीपणामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Aaditya Thackeray : अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी, आदित्य ठाकरे यांची मागणी

अजित पवार यांच्या निधनावर रोहित पवार असो किंवा अनेक लोक संशय व्यक्त करत करत आहे. जे काही घडलं त्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Aditya Thackeray : राज्यसभेच्या जागेवर उबाठा शिवसेनेचा दावा

राज्यसभेवर महाविकास आघाडीची एक जागा जाणार आहे. मात्र या जागेवर जाणार कोण यावरुन पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे. एकीकडे शरद पवार यांच्या नावाची पुन्हा चर्चा होत आहे. तर दुसरीकडे ही जागा कॉंग्रेसने घ्यावी अशी मागणी काही कॉंग्रेस नेत्यांकडून पुढे येत आहे. अशातच आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, रोटेशननुसार ही जागा शिवसेना ठाकरे गटाची आहे.

Shivaji Park : शिवाजी पार्कात काका-पुतण्या एकत्र

छत्रपती शिवाजी महाराज पार्क सुशोभीकरणाच्या कामाला शिवजयंतीच्या निमित्ताने आज शुभारंभ होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा शुभारंभ होत असून काका पुतणे आज या निमित्ताने एकत्र आले आहेत.

भिवंडीत भाजपला मोठा धक्का, 10 नगरसेवक काँग्रेससोबत?

भिवंडीत भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षाला खिंडार पडलंय. भाजपच्या 22 पैकी 10 नगरसेवकांनी बंडाचं निशाण फडकवत काँग्रेसची वाट धरलीय. सूत्रांनी ही माहिती दिलीय. हा मोठा गट थोड्याच वेळात मुंबईतील 'टिळक भवन' इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणारेय.

'ब्लॅकबॉक्स खराब झाला, यावर कोण विश्वास ठेवणार? - जयंत पाटील

'ब्लॅक बॉक्स जाणं अशक्य आहे. आणि त्यामध्ये घड्याळ, मोबाईल सापडलं, त्यामुळे ब्लॅक बॉक्स जातो याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही'. असे विधान देखील जयंत पाटील यांनी केलं आहे.

धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची ऑफर

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी नव्या समीकरणांची चर्चा रंगली असतानाच आता शिंदेसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर एक मोठा डाव टाकलाय.अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीला अध्यक्षपद देण्याबाबत शिंदेसेना अनुकूल असल्याचं प्रवक्ते योगेश केदार यांनी स्पष्ट केले आहे.

86 लाख लाडक्या  बहिणी अपात्र

86 लाख महिलांना अपात्र ठरवल्याने मोठा अंसतोष आहे. त्यामुळे अपात्र महिलांसाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांनी केवायसी करताना तांत्रिक चूका झाल्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना 31 मार्चपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरीवर दाखल

शिवजयंतीनिमित्त शिवनेवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार गडावर दाखल झाले आहेत.

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल

शिवजयंतीनिमित्त शिवनेवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल झाल्या आहेत.

'एनसीईआरटी'ने आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवला

एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात असललेला 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला असून राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली एनसीईआरटीने हा खोडसाळपणा केल्याचा आरोप मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे.

Pune : शिवजयंतीनिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल

छत्रपती शिवजयंती निमित्त आज निघणाऱ्या शोभायात्रेमुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये मध्यभागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, कुमठेकर रस्ता या परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. तर शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्यांसाठी जंगली महाराज रस्ता, बर्वे चौक टिळक रस्त्याने पर्यायी मार्ग दिला आहे. गणेश रस्ता जिजामाता चौक वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे दारूवाला पूल मार्गाने जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर केळकर रस्त्यावरील आप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज शिवनेरी गडावर जाणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर हजारो शिवभक्त दाखल झालेत. आज शिवनेरीवर अनेक शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलारहे उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT