नाशिक न्यायालयात अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच अत्याचारानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर गुन्ह्यात आज सुनावणी होणार आहे. एका घटस्फोटित पीडित महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात यासंबंधी दिली होती तक्रार.
भोंदूबाबा अशोक खरातची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातने ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणाऱ्या औषधे, वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरातची बायको कल्पना खरातचा गेल्या 2 दिवसांपासून पोलीस यंत्रणांना शोध लागत नाहीये. फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध SIT आणि शिर्डी पोलीस घेत आहेत. कल्पनाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने लोकेशन मिळण्यात अडचणी येत असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. खरात कुटुंबाचा देखिल आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असतांनाच SIT कडून कुटुंबावर वॉच का ठेवण्यात आला नाही ? हा देखिल प्रश्न उपस्थित होत आहे.
भोंदू अशोक खरातला काल पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्याची SIT ने मागणी केली होती. तर याच दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात आज संध्याकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील २४ तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धा संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. "इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला करताना ट्रम्प यांनी इराणचे नौदल संपले असून त्यांचे सर्व मोठे नेते मारले गेले आहेत. इराणचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली असून आपण युद्ध संपवण्याच्या खूप जवळ आहे. कधीही मिळवला नाही असा विजय आम्ही मिळवला आहे. आम्ही आमची उद्दीष्ट आम्ही पूर्ण केली असून इराणला अण्वस्त्रसज्ज देश होण्यापासून रोखल्याचा मला अभिमान आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.
इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बुधवारी हे स्पष्ट केलं की, ब्रिटन अमेरिका-इराण युद्धात सहभागी होणार नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी हे ठळकपणे सांगितलं की, हे आमचं युद्ध नाही, त्यामुळं यामध्ये सामिल हे राष्ट्रहितामध्ये नाही. त्याचबरोबर ज्या मार्गानं पश्चिम आशियात इराणमधून कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते तो हॉर्मुझ सामुद्रधुनिका मार्ग मोकळा करण्यासाठी ३५ देशांची बैठक बोलावली आहे.
आखाती युद्धामुळे रॉकेलच्या (केरोसीन) कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा कमी झाल्यामुळे सरकारने रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आता पुरवठा दाराच्या कमिशनमध्येही दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यने संबंधित महिलेला वारंवार अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील महिलेच्या मोबाईलमधील स्क्रीनशॉटही समोर आले आहेत.
गोकुळ दूध संघाची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. मात्र, अशातच या संस्थेची चौकशी होणार असून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे विभागाकडून हे चौकशीचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.