करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी नेत शिरूर पोलिसांनी गुन्ह्याची पुनर्रचना केली. त्यानंतर गावभर आरोपींची धिंड काढण्यात आली. यावेळी गावतला भाई बनतोय का अशा शब्दांत पोलिसांनी आरोपींना फटकारत कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असा स्पष्ट संदेश दिला. पोलिसांच्या या धडक कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून भाईगिरी आणि दहशत माजवणाऱ्यांना शिरूर पोलिसांनी थेट इशाराच दिल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या समवेत आंदोलन करत असलेल्या अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांचा देखील सहभाग आहे. दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकून ठेवल आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला. शांततेमध्ये आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आम्हाला अटक केली तसेच राहुल गांधी यांना सुद्धा बळजबरीने उचलून नेले, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आता काँग्रेस स्वस्त बसणार नाही, असा इशारा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिला.
दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झालं असून सोमवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा नेला. यावेळी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. यावरून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर विरोधी पक्षातील १२० खासदारांसह आंदोलन केले. तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांच्या सह इतर नेत्यांची धरपकड करत त्यांना पोलिस ठाण्यात नेले आहे. या वेळी झालेल्या झटापटीत राहुल गांधी यांना दुखापत झाली आहे.
नीट पेपर लीकविरोधातील दिल्लीतील धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या आमदार डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीच ताब्यात घेतलं. राहुल गांधींसोबत आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना दिल्ली पोलिसांची कारवाई केल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.
डॉ. नितीन राऊत यांना पोलिसांनी बसमध्ये बसवून ताब्यात घेतलं. त्यांना नागपूरच्या जाफरपूर कला पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस ठाम असल्याचं यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी सांगितलं. आंदोलन दडपून जनआक्रोश थांबणार नाही, डॉ. राऊत यांचा इशारा. राहुल गांधींना ताब्यात घेणं म्हणजे लोकशाहीवर आघात असल्याची टीकाही यावेळी राऊत यांनी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर या नेत्यांकडून ठिय्या आंदोलन केले जात होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते.
जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले आहेत. ते आता केंद्रीय मंत्री शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दादरमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही सहभागी झाल्या आहेत.
नीट पेपर फुटीप्रकरणी अभिजीत दीपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करताना गुन्हा दाखल झाला असेल किंवा कायदेशीर नोटिस आली असेल तर त्यांनी shiv sena ubt legal@gamil.com या ईमेलवर संपर्क साधावा. त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. राज्यातील सर्व वकिलांनी या विद्यार्थ्यांच्या केसेस मोफत लढवाव्यात. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना साथ द्यावी, असे आवाहन आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जंतर मंतरवर दाखल झाले आहेत. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते सध्या विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थाना समोर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जून खरगे आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. पण दुसरीकडे पोलिस फोर्सही वाढवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करणारे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आंदोलनस्थळावरून काँग्रेसच्या काही खासदारांना ताब्यात घेतले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विद्यार्थी आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ठाकरे हे भेट घेणार आहेत.
अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व बडे नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे सर्व नेते गेली तासाभरापासून मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित 'मुक्त व्यापार करारा'ला (India-US Trade Deal) विरोध करण्यासाठी दिल्लीतील किसान घाट येथे देशव्यापी आंदोलन करण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तीव्र दडपशाही सुरू केली आहे. 'देश बचाओ मोर्चा' च्या बॅनरखाली देशातील १५४ हून अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सामील झाल्या असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख मा. खा. राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह हजारो शेतकऱ्यांना पोलिसांनी राजघाट आणि दिल्लीच्या सीमा भागातून ताब्यात घेतले आहे.
अभिजीत दिपकेंच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या.. लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजे, लेकर तिथे आंदोल करण्यासाठी गेले होते. आज एक महिना झाला तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथे कोणतीही घटना झाली नाही आणि यांनी लाठीचार्ज केला. लेकर काय दहशतवादी आहे का ते? 18 -20 वर्षांची मुलं आहेत ती. तुम्ही दहशतवाद्यांना सोडून देतात आणि तुम्ही लेकरांवर लाठीचार्ज करता, सरकारने हे योग्य केलं नाही.
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद संसदेत उमटलेत... लोकसभेसह राज्यसभेत विरोधकांनी या मुद्द्यावर बोलण्याची मागणी लावून धरली मात्र यावर बोलण्यास नकार दिल्यानं विरोधक आक्रमक झाले... विरोधकांनी मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळ झाला... कालसारखं आजही विरोधकांनी NEETच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानं आजही कामकाज तहकूब करण्यात आलंय...
राज्यातील रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे एक रुपया भाड्याने कोट्यवधींच्या जमिनी आंदण दिल्या जाणार आहेत. राज्यातील प्रमुख सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या परिसरात धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याची जबाबदारी गुजरातमधील सेवादान आरोग्य फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे. या निर्णयानुसार संबंधित संस्थेला धर्मशाळा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या सरकारी जमिनी वार्षिक केवळ एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्यावर तब्बल 49 वर्षांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असल्याच प्रत्यक्ष कृतीमधून सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकीयेन यांनी दाखवले. आषाढी वारीत विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासन्तास रांगेत उभे राहतात. मात्र सात तासांहून अधिक काळ चालत आलेल्या 80 वर्षाच्या वृद्ध आजी-आजोबांची अवस्था पाहून सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयेन त्यांच्यासाठी पुंडलिक ठरले. त्यांनी या ज्येष्ठ वारकऱ्यांना थेट विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवून मानवतेचा आदर्श घालून दिला.
दिल्लीच्या जंतरमंतर येथील उपोषणाला अहिल्याननगरमधून पाठिंब्यासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरला आहे. सोनम वांगचुक अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला अहिल्यानगर शहरातील आंबेडकर अनुयायांनी पाठिंबा दर्शवला. भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंबेडकरी संघटनांच्या आंदोलनला सुरुवात केली. 'मोदी हटाव, देश बचाव', घोषणांनी परिसर दुमदुमला होता. लाठी हल्ल्याचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आज आक्रोश मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी नीट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांना न्याय, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या छायाचित्राला काळे फासून ते पायदळी तुडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
इंधनात 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट अन्नसुरक्षेला बाधा पोहोचवत असल्याचा किंवा जलस्रोतांचा ऱ्हास करत असल्याचा दावा केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत लावला. ही योजना पूर्णपणे ‘टाकाऊतून टिकाऊ’ या तत्त्वावर आधारित असल्याचे सरकारने स्पष्ट केले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, अन्नसुरक्षेचे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त कृषी उत्पादनाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामुळे अन्नधान्य उपलब्धतेवर किंवा देशाच्या अन्नसुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
‘जलजीवन मिशन’ या ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत आर्थिक अनियमितता आणि निकृष्ट कामाच्या 18790 तक्रारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे आल्या आहेत. या प्रकरणात 635 विभागीय अधिकारी, 1020 कंत्राटदार आणि 155 त्रयस्थ तपासणी संस्थांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक यांनी विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर देताना जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी ही माहिती दिली.
दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालयांनी आज राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयाला भेट दिली.
पेपरफुटी, तरुणांवरील हल्ल्यावरून राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ झाला आहे. या गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
आज दुसऱ्या दिवशी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे समर्थक जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन करत असून संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत. तर या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज सहभागी झाले आहेत.
नवी दिल्ली येथील संसद वाचनालय इमारतीतील जी. एम. सी. बालयोगी सभागृहात (G.M.C. Balayogi Auditorium) एनडीए संसदीय दलाची 'मंगल मिलन' बैठक सुरू झाली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी कालच्या आंदोलनादरम्यान ज्यांना मारहाण झाली त्यांची माफी मागितली आहे.
सोमवारी सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द मेट्रो स्थानकाजवळ एका भरधाव बेस्ट बसने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका वृद्धाचा मृ्त्यू झाला आहे. तर तर बस चालकासह 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील वलगाव मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. वलगाव बसस्थानक परिसरात सहा युवा हल्लेखोरांनी दोन युवकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. जुन्या परंतु किरकोळ कारणातून या हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. पाचही युवा हल्लेखोरांना पकडत पोलिसांनी अटक केली आहे.
आज जंतर मंतरवर सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. आता पुन्हा एकदा पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने काढलेल्या संसद भवनावरील मोर्चाला हिंसक वळण लागलं. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्यानंतर काही आंदोलकांनी देखील प्रतिकार केला यामध्ये दिल्लीतील 118 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरुच राहणार आहे. काल संसद भवनावर काढलेल्या मोर्चादरम्यान आंदोलकांवर मोठा लाठीचार्ज करण्यात आला. तरीही आंदोलन मागे न घेता ते आणखी आक्रमकपणे सुरू ठेवण्याचा निर्णय सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांनी घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.