Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत आढळली जीवंत काडतुसं; बिहारमधील तरुणाला अटक

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजीच्या राज्य आणि देशातील दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

Bombay IIT : आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत आढळली जीवंत काडतुसं; बिहारमधील तरुणाला अटक

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत जीवंत काडतुसे सापडली आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पवईमधील हॉस्टेलमध्ये बॅगा तपासणीदरम्यान ही प्रकार उघडकीस आला आहे. ही बॅग आणि त्यातील काडतुसं ही सर्वोत्तम चौधरी याची असल्याचे संबंधित विद्यार्थ्याने सांगितले. चौधरी हा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी आहे, तो १२ फेब्रुवारी रोजी कॅम्पसमध्ये आला होता. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी पुन्हा कॅम्पसमध्ये आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने ही काडतुसं बिहारमधून विकत आणल्याची कबुली दिली आहे.

Rohit Pawar : रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; कार्यकर्त्यांचं पोलिसांना निवेदन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार हे सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांपासून व्हीएसआर कंपनी आणि अनेक नेत्यांना ते अंगावर घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मला भीती वाटत नाही. पण माझ्या घरच्यांना भीती वाटते, असे खुद्द रोहित पवार यांनीही बोलून दाखवले आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही ती भीती बोलून दाखवली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी खर्डा पोलिस ठाण्यात दिले आहे.

आता आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करता येणार नाही : विवाह नोंदणी कायद्यात बदलाचा प्रस्ताव

गुजरातमधील भाजप सरकार विवाह नोंदणी कायद्यात दुरुस्ती करणार आहे. लग्न करण्यासाठी आता आई-वडिलांची परवानगी बंधनकारक असणार आहे. लव्ह जिहादचं कारण देत गुजरात सरकारने हे पाऊल उचलले आहे. गुजरातमधील काही संघटनांकडून विवाह कायद्यात दुरुस्तीची मागणी होत होती, त्या पार्श्वभूमीवर ही गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नुकताच हा प्रस्ताव विधानसभेत सादर केला आहे.

Shivsena UBT : चंद्रपुरातील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार : संजय राऊत

भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका नाही. तशा प्रकारच्या सूचना चंद्रपूर महापालिकेतील नगरसेवकांना देण्यात आल्या होत्या. त्या नगरसेवकांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केलं असेल तर आम्ही आता हळूहळू सगळ्या कामातून मोकळे झालो आहोत, त्यामुळे चंद्रपुरातील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Mumbai : मुंबई महापालिकेचा २५ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २५ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करतील आणि तो गगराणी हे सभागृहात मांडतील. दरम्यान, ८ मार्च २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या खर्चाचा हिशेब द्या. कोणाला किती निधी दिला, याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर ऋतू तावडे यांच्याकडे केली आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच

मुंबई महानगरपालिकेत रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिंदेसेनेत आता जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

शरद पवारांना पुन्हा रुग्णालयात दाखल करणार

शरद पवार यांना आज पुन्हा पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक रुग्णालयात करणार दाखल करण्यात येणार आहे. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अजितदादांचा अपघाताच संशय, बारामतीमधील लोणी भापकर गाव बंद राहणार

अजित पवार यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय बारामती तालुक्यातील लोणी भापकर ग्रामस्थांना आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी हे गाव आज बंद राहणार आहे. यासंदर्भात लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहले आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दिवंगत महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण

वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दिवंगत महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. मुंडे यांचा अल्पवयीन मुलगा हा क्लासवरून घरी येत असताना त्याला अडवून मारहाण करण्यात आली..मारहाण करणारा बालाजी आघाव हा वाल्मिक कराडचा समर्थक आहे.याप्रकरणी परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT