Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : खरातचं नाशिक मनपातील अधिकाऱ्याशी कनेक्शन? गर्भपातासाठी मदत केल्याचा संशय

Breaking Marathi News live Updates 23 April 2026 : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. यासह आज दिनांक 23 एप्रिल रोजीच्या दिवसभरातील सर्व राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

पुण्यात परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या असून पॅट-3 चा मराठी, गणित, इंग्रजीचा पेपर फुटला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणात नाशिक महानगरपालिकेतील एका मोठ्या अधिकाऱ्याने खरातला गर्भपातासाठी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. नाशिकच्या चार डॉक्टरांनी भोंदू अशोक खरातला गर्भपाताच्या गोळ्या मिळवून देण्यासाठी मदत केल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक मधील डॉक्टर व सोनोग्राफी सेंटर पुन्हा एसआयटीच्या रडारवर आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतदानात राडा; मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी

बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक - सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१ टक्के मतदान.

दिलीप काकडे या भोंदू बाबावर गुन्हा दाखल

नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदू बाबावर कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील ३ दिवस अवकाळी पाऊस असणार असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

ममता बॅनर्जी जिंकल्यास बंगालचं स्वतंत्र राष्ट्र बनेल - अग्निमित्रा पॉल

आज पश्चिम बंगालमध्ये मतदान पार पडत आहे. अशातच भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार अग्निमित्रा पॉल यांनी जर ममता जिंकल्या, तर त्या पश्चिम बंगालचं रूपांतर एका स्वतंत्र देशात करतील, असं वक्तव्य केलं आहे.

Rahuri Assembly By Election 2026: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. यासाठी एकूण 374 मतदान केंद्रे आहेत. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. इथे अक्षय कर्डीले विरीद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

Baramati Byelection 2026 : शरद पवारांची तब्येत आता बरी आहे - सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी शरद पवारांच्या तब्येती संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, "शरद पवारांची तब्येत आता बरी आहे. त्यांना मतदान करायचं होतं. परंतु एक्सप्रेस वे बंद आहे उन्ह देखील जास्त आहे. हेलिकॉप्टरने येणे शक्य नसल्यामुळे ते आले नाहीत."

बारामती मधून 2029 ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं - जय पवार

बारामती मधून 2029 ला मी उमेदवार असावं असं बारामतीकरांना वाटतं ही लोकांची इच्छा असं वक्तव्य जय पवार यांनी केलं आहे. मात्र, माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत रहावं, असंही जय पवारांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आज मतदान

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानासाठी मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत जाऊन बजावला मतदानाचा अधिकार

सुनेत्रा पवार उमेदवार असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. यासाठी संपूर्ण पवार कुटुंब मतदानाचा हक्क बजावत आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत जाऊन बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार काटेवाडी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. तर मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

Voting for Baramati by-election today : बारामती पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरूवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT