विधानसभेत सोमवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि तीन सदस्य अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर भाषण करणार आहेत. प्रत्येक वेळी शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जातो आणि त्यांच्याकडूनच शोकप्रस्ताव वाचून दाखवला जातो. मात्र, काही सदस्यांकडून सभागृहात अजित पवार यांचा शोकप्रस्तावावर मत मांडण्याचा आग्रह होता. त्यानुसार सीएम फडणवीस यांनी यावेळी अजितदादांच्या आठवणीना उजाळा दिला. सभागृहात असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल, अशी कल्पना कधीच केली नव्हती. लाही वेदना कधीच कमी होता नाहीत अशी ही वेदना असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. पायलट वर का शंका घेतली पाहिजे? यासंदर्भातील सगळे पुरावे मी माझ्या पत्रकार परिषदेत मी दिले आहेत” असं आमदार रोहित पवार म्हणाले. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी शोक प्रस्ताव सभागृहात मांडला जाईल. त्याआधी सभागृहाबाहेर रोहित पवार मीडियाशी बोलले. “सगळे पुरावे तपास यंत्रणा योग्य पद्धतीने गोळा करत आहेत का?. दादांच्या अपघाताची सखोल चौकशी ही झाली पाहिजे” या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमचे कोणीच येणार नव्हते, कारण काही कामं होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना यासंदर्भात कळवलं होतं.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक अंकीत प्रभू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेतली. ही भेट शिंदे सेनेच्या महापालिकेतील पक्ष कार्यालयात झाली. मुंबई महानगर पालिकेत आज स्वीकृत नगरसेवकपदा साठी शिंदेंच्या सेनेकडून आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना संधी दिली जाणार आहे.
भाजपचे आमदार तथा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह 100 भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रखंडातील मंगरोडीह ग्रामपंचायतीचे पंचायत सचिव तसेच एफएसटी अधिकारी मो. मन्सूर यांच्या तक्रारीवरून नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माजी रेल्वेमंत्री आणि एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे नंबर दोनचे नेते मुकुल रॉय यांचे आज पहाटे निधन झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच अजितदादांच्या अपघाती मृत्यूमागचे सत्य समोर आलेच पाहिजे, मात्र त्यांचा अपमान होईल, कुटुंबाला त्रास होईल असे कोणीही वागू नये, असंही फडणीवस म्हणाले आहेत.
'महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात काय होणार? हा प्रश्न आता निरर्थक आहे. कारण ‘उत्तर’ स्पष्ट आहे ते म्हणजे, ‘काहीच होणार नाही.’ लोकसभा, विधानसभा, न्यायालये, निवडणूक आयोग अशा घटनात्मक संस्था टिकवण्याऐवजी मोडीत काढण्यावर ज्या सरकारचा अधिक विश्वास आहे, त्यांच्याकडून संसदीय कार्य चांगल्या प्रकारे चालवले जाईल हे कसे मानायचे?' असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून महायुती सरकारवर टीका करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद तसेच प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज प्रकाश सुर्वे यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तर ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत.
आज सोमवार २३ फेब्रुवारी पासून राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.