भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालेगाव महानगरपालिकेत काही कर्मचाऱ्यांनी नमाज पठण केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे तेथील अधिकाऱ्यांनीही याची दुजोरा दिल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचं निलंबन करावे असंही म्हटलं आहे.
ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ निवासस्थानावर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी इतकी आहे.अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती ईडीने दिली आहे.
पुणे : वाहतूक नियमभंग करूनही ई-चलानचा दंड न भरलेल्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना नोटीस पाठविण्यात येणार असून, ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास चालक परवाना निलंबन किंवा न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीतून आउटगोइंग सुरु होती. तर आता महानगरपालिका निवडणुकी नंतर बहुजन विकास आघाडीत इनकॅमिन्ग सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या गळचेपीमुळे वसईतील भाजपच्या ज्येष्ठ जिल्हा सचिव, महाल मोर्चाचे विधानसभा प्रमुख ॲड. साधना धुरी यांनी आज (25 फेब्रुवारी) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर व बविआचे ज्येष्ठ नेते जितूभाई शहा यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी भाजपमधून बविआत महापालिका निवडणुकीपूर्वी प्रवेशकर्ते झालेले चंद्रशेखर धुरीही उपस्थित होते. साधना धुरी यांच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. यावेळी साधना धुरी यांनी कोणाचं नाव न घेता खरे संघर्ष नेते हितेंद्र ठाकूर (आप्पा) असल्याचा टोला भाजप आमदारांना लगावला.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांचा तब्बल अकराशे मतांनी पराभव झाला. तर या ठिकाणी भाजपचे व्यंकोजी खोपडे हे विजयी झाले आहेत. या निकालानंतर वसंत मोरे यांच्याकडून व्यंकोजी खोपडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले आहे.
व्यंकोजी मारुती खोपडे हे आता महापालिकेचे नगरसेवक आहेत. त्यांनी पूर्वी केलेल्या विकासनिधी बाबतचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार पाहता, हा प्रकार पुणे महानगरपालिकेच्या विकास निधीच्या बाबतीतही घडू शकतो. म्हणून खोपडे यांच्या बाबतीत पुणे जिल्हा परिषदेमध्ये केलेल्या तक्रारींचा निकाल नाही तोपर्यंत त्यांना कोणताही विकास निधी देऊ नये अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे करून सराफा व्यापाऱ्याकडून तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बोरीवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर-पुणे या राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक तासनतास रस्ता अडत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत असते.
त्यातच अवजड वाहतुकीमुळे अनेक अपघात होत असतात त्यामुळे वाहतूक कोंडीतून मनमाडच्या नागरिकांची सुटका व्हावी या साठी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने रेल्वे उड्डाण पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले.
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे काँग्रेस भवनसमोर आंदोलन
“नरेंदर सरेंडर” अशी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर देशहिताशी तडजोड केल्याचा आरोप, अनेक शेती कामगार, रोजगार असे अनेक मुद्दे अधोरेखित केले.
स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण एक वर्ष पूर्ण झाले.
आरोपी दत्ता गाडेचा न्यायालयात निर्दोषत्वाचा दावा
पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये 25 फेब्रुवारी 2025 रोजी घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडेने न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित करण्याचा अर्ज केला.
आरोपीनी जामीन अर्ज केली आहे परंतू अजून न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नाही, सुनावणी पुढे ढकलली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले
शेगाव संस्थांचे अध्यक्ष निळकंठ पाटील यांनी त्यांचा स्वागत केलं
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हेही उपस्थित होते
श्री संत गजानन महाराज संस्थान राष्ट्रपतींचा स्वागत आपल्या पारंपारिक पद्धतीने केलं
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यु नंतर DGCA च्या विमानांवर उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे.
त्या पार्श्वभुमीवर रोहित पवारांनी आज मारिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतू माध्यमांशी बोलताना पवार यांनी आपली तक्रार घेतली नसल्याचे सांगितले आहे.
जालन्याच्या व्यापाऱ्याची गुजरात मधील व्यापाऱ्यांकडून तब्बल पाच कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. जालना औद्योगिक वसाहतीतून उधारीवर लोखंडी सळाया नेऊन पैसे न देता पैसे मागितल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी गुजरातीमधील व्यापाऱ्यांकडून जालन्यातील शाश्वत इन्फ्रास्ट्रक्चरच्या वसुली अधिकाऱ्याला देण्यात आली आहे.
बीडच्या जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याच्या विरोधात गुन्हा दाखल असून बीड न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तरी त्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले आहेत.
नाशिकच्या मालेगाव शहरातील मोसमपूल नदीकिनारी ताडी विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला असून, त्याठिकाणी अवैध रित्या ताडीची विक्री होत असल्याची तक्रारी येत होत्या,त्या अनुषंगाने त्याविभागाने येथे छापा टाकला असून, त्यात त्यांनी विविध ठिकाणावरून ताडीचे नमुने गोळा करून पुढील तपासणीसाठी ते नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे राज्य उत्पादन विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलावडे यांनी सांगितले.
महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथील शेगाव श्री संत गजानन महाराज मंदिराला भेट दिली. येथे दर्शन घेत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात आरतीही करण्यात आली. या प्रसंगी मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग तसेच मंदिर संस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सत्ता स्थापने अगोदरच नुतन जिल्हा परिषद सदस्याच्या कुणबी जात प्रमाणपत्रावरुन वाद पेटलाय. उमरगा तालुक्यातील तुतोरी जिल्हा परिषद गटातील अपक्ष निवडणून आलेल्या उमेदवार अर्चना जाधव यांच्या कुणबी जात प्रमाणपञावर आक्षेप घेण्यात आला असुन अर्चना जाधव या मुळ कर्नाटकातील असुन कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळीचे खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप करत भाजपच्या पराभुत उमेदवार प्रियंका आष्टे यांनी जिल्हाधिकारी व जात पडताळणी समीती कडे तक्रार दाखल केलीय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील एका मुस्लिम शाळेत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही घटना दोन महिन्यानी पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुस्लिम शाळेतील दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने ही मारहाण केल्याचे समजते. लाकडी दांड्याने त्या शिक्षकाने त्या अनाथ मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ सावंतवाडी येथील एका मुस्लिम शाळेतील असल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभेच्या जागेसाठी मआविमधील आदित्य ठाकरे आपल्या पक्षाला इच्छुक आणि आग्रही आहेत. यातच शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यावर मोठं विधान केलं आहे. आम्ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन दिवसांत बोलणार आहोत. बारामती पोट निवडणूक लढायची की नाही, याबाबत देखील आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. तर राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव पुढे आल्यानंतर पुढे कोण येईल असं वाटत नाही, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी 3 मार्चला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. सध्या अर्ज भरण्यासाठी सहा दिवस राहिलेले असताना महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार म्हणून कोणते नाव पाठवायचे? यावर अद्याप मविआची एकत्रित चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितला असून शरद पवार व आपल्या पक्षातील इतर नेत्यांसोबत एकत्र चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळांबाबत बहुजन कल्याण विकास विभागात मोठा वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी स्पष्ट आदेश देऊन संबंधित संस्थांची मान्यता नाकारली असतानाही संचालकांनी पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश दिल्याने प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. राज्यातील 25 निवासी शाळांनी कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटल्याचा ठपका ठेवत यापूर्वी त्यांची मान्यता रद्द करण्यात आली होती.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष व शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी मंत्री व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकरांचे सुपुत्र भाजपमध्ये प्रवेशासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. 600 कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील एका मुस्लिम शाळेत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही घटना दोन महिन्यानी पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुस्लिम शाळेतील दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने ही मारहाण केल्याचे समजते. लाकडी दांड्याने त्या शिक्षकाने त्या अनाथ मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ सावंतवाडी इथल्या एका मुस्लिम शाळेतील असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरवात जुलै 2024 ला करण्यात आली होती. तेव्हा लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 46 लाखांच्या दरम्यान होती. त्यानंतर राज्य सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्यानंतर 1 कोटी 90 लाख महिला लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी योग्य केवायसी भरणाऱ्या 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात महिला व बाल विकास विभागनं डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाठवले होते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार कोण याची चर्चा असतानाच, उमेदवार ठरल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागानं सोमवारपासून जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येत आहेत.
महाराष्ट्रातील पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत असल्याने मराठी शाळा बंद पडत असल्याची स्थिती असल्याचे शासनाने सभागृहात कबूल केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्सवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'राज्यातील तब्बल २५५ शाळा मागील दोन वर्षांत बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातच मराठी भाषेच्या शाळांची ही स्थिती होणे अतिशय गंभीर आणि खेदजनक आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दुसरीकडे शिक्षणाच्या परिघातून मराठी भाषा हळूहळू दूर होतेय असे चित्र दिसते. अभिजात भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी मराठी भाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरता येऊ शकतो. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन मराठीतून शिक्षण अधिकाधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी काम करावे. मराठी भाषेची पताका फडकवत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.'
मुंबईत रेल्वे पोलीस भरती दरम्यान धावण्याच्या चाचणीत एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 30 वर्षीय अक्षय मिसाळ असं या उमेदवाराचं नाव आहे. सोमवारी सकाळी घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर सोळाशे मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला एका रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे. भाजपकडून मच्छिंद्र सानप हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादीकडून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Shirdi News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीव प्राणी कायद्यात बदल करण्याची मागणी करणारी सुमारे वीस हजार पत्रे पाठवली आहेत. ही पत्रे बैलगाडीतून राहुरी पोस्ट कार्यालयात जमा केली आहेत.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आज शेगाव दौऱ्यावर असून त्या श्री संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात विशेष आरतीही करण्यात येणार आहे. इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शेगावात येणार आहेत. द्रोपदी मुर्मूंसोबत राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शेगावला जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.