आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समलकोट मंडलच्या परिसरातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याची समोर येत असून सहा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत.
सायन रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २० मध्ये एका बेडवर तीन-तीन रुग्णांना ठेवून उपचार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काही रुग्णांना बेड न मिळाल्याने जमिनीवरच उपचार करावे लागत आहेत. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वात मोठे बजेट असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात अशी ढिसाळ व्यवस्था का? आरोग्याचा पैसा जातो कुठे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर अक्षरशः कोसळले असून, कांद्याला केवळ 500 ते 700 रुपयांचा कवडीमोल भाव मिळत आहे, ऐन हंगामात कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च तर दूरच, पण साधा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे, शासनाच्या या दुर्लक्षामुळे हतबल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने थेट 'आता आम्ही जगायचं कसं आणि करायचं काय?' असा संतप्त सवाल व्यवस्थेला विचारला आहे.
राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातून तीन खासदारांना आरामात निवडून पाठवू शकते एवढे आमदारांचे संख्याबळ भाजपकडे आहे. महाविकास आघाडीचे एक मत झाल्यास त्यांचाही एक खासदार होऊ शकतो. मात्र सर्वाधिक चुरस भाजपात सुरू आहे. पक्षाच्यावतीने २५ जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. यात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, चंद्रपूरचे माजी खासदार व ओबीसी आयोगाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर आणि गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांचा समावेश आहे. या तीनही इच्छुकांनी पक्षाकडे राज्यसभेसाठी विचार करावा अशी मागणी केली आहे.
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील इंदिरा नगर परिसरात लागलेल्या भीषण आगीत चार घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेख शाहिद शेख वाहिद, मुद्दशीर कुरेशी, संतोष आवटे आणि राजेंद्र तायडे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ संजय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ पंचनामा करण्याचे व नुकसानग्रस्तांना शासनाकडून त्वरित मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा येथील चाळीस वर्षे विवाहिती व शिरपूर तालुक्यातील युवकाने डोक्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या घालून आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी घटना दिसून येत आहे.
सातारा येथून दरोडा टाकून 21 तोळे सोने लंपास करणाऱ्या पाच जणांच्या शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत, सातारा येथून 21 तोळे सोनं लंपास करून या चोरट्यांनी धुळे गाठले होते.
इराणमधील परिस्थिती अत्यंत खराब आहे. तेहरानमध्ये सातत्याने हल्ले सुरू आहेत. पुढच्या क्षणात काय होईल, हे सांगता येत नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला तातडीने मदत करावी, अशी मागणी इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांनी केली आहे. सध्या इस्त्राईलने इराणवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.
बीडच्या परळीतील आमदार धनंजय मुंडे समर्थक गोविंद फड यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून फेसबुक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांचा खेळ खल्लास अशा आशेची पोस्ट केली आहे.
टिपूला आम्ही सुलतान बिलतान मानत नाही, तो टिपड्या आहे. त्याचं पूर्ण नाव वापरत जाऊ नका. तो सुलतान नसून टिपड्या आहे. याच्यापेक्षा तो काही वेगळा नाही. आपणच त्याचं नाव घ्यायचं. काही लोचट लोकं त्याला सुलतान म्हणतात, तो कसला सुलतान? असा सवाल आमदार संग्राम जगताप यांनी केला.
सातारा नगरपालिकेत सत्ताधारी भाजपने कॉपी पेस्ट अर्थसंकल्प मांडला आहे. भाजपच्या निम्म्याहून अधिक नगरसेवकांचा कोणताही अभ्यास नाही. महाविकास आघाडीचे नगरसेवक हे भाजपचा भ्रष्टाचार उघडा पाडण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या नगरसेविकेने दिला. सातारा नगरपालिकेत एकाही महिला नगरसेवकीने आपले मत नोंदवलेले नाही. त्या ठिकाणी महिला नगरसेविकेला बोलायची संधी दिलेली नाही. साताऱ्यात फक्त पुरूषराज चालू आहे, असेही त्या नगरसेविकेने म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा डीजीसीएकडून प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार आहे. या अहवालाची संपूर्ण राज्याला प्रतिक्षा आहे. या अहवालानंतर चौकशीची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे. डीजीसीएच्या संकेतस्थळावर आज सायंकाळी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबईतील चेंबूरमध्ये इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजलावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सहा कामगार सहा मजल्यावरून पडले होते. त्यातील पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोघे अत्यावस्थ आहेत, असे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. महापौर ऋतू तावडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे.
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अत्यंत भावूक स्टोरी शेअर केली आहे. वडिलांसोबतचा एक खास फोटो पोस्ट करत जय पवार यांनी केवळ 'मिस यू डॅड' असे दोन शब्द लिहिलेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बारामतीत दाखल झालेत. अजितदादांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झालाय. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीला आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलंय. दरम्यान रोहित पवार यांच्या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'सुनेत्रा पवार यांच्याबाबत जो निर्णय घेतला गेला त्यात आमच्या पक्षाचा सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते नेत्यांनी मला माहिती दिली. कागदपत्रांसह ते नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता'.
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकार 1 मार्चपासून सिम बाइंडिंगचा नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार WhatsApp, Telegram आणि Signal सारखी अॅप्स थेट मोबाईल सिमशी जोडली जातील. जर मोबाईलमधून सिम काढले तर ही अॅप्स तात्काळ बंद पडतील. वाय-फाय किंवा अन्य नेटवर्कद्वारेही सिमशिवाय ही अॅप्स वापरता येणार नाहीत.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता असते. मागील काही महिन्यांपासून प्रामुख्याने 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी सुमारे 49 रुपयांनी दरवाढ केली होती. मार्चमध्येही दरात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र सध्या स्थिर आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ई-केवायसीच्या त्रुटीमुळे अनेक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने संतप्त लाडक्या बहिणींनी थेट महिला व बाल विकास कार्यालयात धडक दिली. मात्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलीही उत्तर न देता लाडक्या बहिणींना बाहेर काढून कार्यालयालाच कुलूप लावल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महिला व बाल विकास कार्यालयाबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
बदलापूर स्त्री बीज तस्करीचे रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. नाशिकच्या मालती आयव्हीएफ सेंटरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा घातला आहे. एकाच महिलेने अनेकवेळा स्त्री बीज विक्री झाल्याचं समोर आलं आहे. स्त्री बीज तस्करी प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली. या पाचही जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःची ओळख लपवून स्त्रीबीजांची तस्करी केल्याचं समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीन मागील एक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, हे मशीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहे.कोट्यवधी रुपये खर्चून बसविण्यात आलेले एमआरआय मशीन उद्घाटनाअभावी सुरूच झालेले नाही. लवकरात लवकर एमआरआय सेवा सुरू करण्याची मागणी केल्या जात आहे.
आगामी शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई बोर्डासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये या तीन भाषांपैकी 2 भाषा भारतीय असणार आहेत तर, इंग्रजीचा परदेशी भाषांच्या गटात समावेश केला जाणार आहे. म्हणजेच इंग्रजी ही भाषा यापुढे अनिवार्य मानली जाणार नाही. ती निवडक भाषांपैकी एक मानली जाईल. विद्यार्थ्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यासारख्या परदेशी भाषांमधून एक भाषा निवडावी लागणार आहे.
'रोहित पवार यांना त्यांचे काका, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी संशय आहे. त्यामुळे ते गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील अजितदादांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशीसाठी गुन्हा दाखल करण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला पाहिजे,' असे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
'डीजीसीए-व्हीएसआर'च्या हातमिळवणीतून अजितदादांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक दावा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. या यंत्रणेची स्वतंत्र चौकशी झाल्यास सर्व भ्रष्टाचार बाहेर येईल. 'व्हीएसआर' हा एक क्रमांकाचा आरोप आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गडचिरोली भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेले आणि नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून दीड महिन्यापूर्वीच पदभार घेणारे मुक्तेश्वर काटवे यांचा शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. कारगिल चौक परिसरात डुक्कर आडवे आल्याने त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन ते रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
भाजपचे गडचिरोली नगरपालिकेतील स्वच्छता आणि आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे (56) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला मोकाट डुक्कराने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले.
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहेय. दरम्यान 'राज्यसभेसाठी काँग्रेसमधून 4-5 जण इच्छूक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, इच्छुक असणे म्हणजे उमेदवार नाही. इच्छुकांच्या नावाला पक्षश्रेष्ठींना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर उमेदवारी निश्चित होते.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अजय तावरेंना जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.पोर्शे कार अपघात प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) गैरव्यवहार प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्विकारला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ७० हून अधिक जणांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात कोणताही फौजदारी खटला तयार होत नसल्याचे विशेष न्यायालयाचे न्या. महेश जाधव यांनी शुक्रवारी अहवाल स्वीकारताना स्पष्ट केले.
लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड 16 मार्चला होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकत काँग्रेस झेडपीत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर 18 जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 सदस्य निवडून आले आहेत. राज्यात भाजपा-राष्ट्रवादीची युती असल्यामुळे जिल्हा परिषदेत या दोन पक्षांची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. तर, राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भाजपचा अध्यक्ष होणार आहे.
भिवंडी महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी केली. त्यामुळे बंडखोर नारायण चौधरी हे काँग्रेसच्या मदतीने महापौर झाले आहेत तर काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहा बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.