Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: अशोक खरात भोवती फास आवळला, फॉरेन्सिक रिपोर्ट तयार

Political Breaking Live Marathi Headlines Updates: रुपाली चाकणकर यांचा राजीनामा, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, गॅस सिलिंडरचा तुटवडा, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट तसेच राज्यातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

अशोक खरात चालवायचा हवाला रॅकेट

भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करत होता. त्याच्या पैशांची देवाण-घेवाण दुबईपर्यंत होत असल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Viral Video : अशोक खरातच्या व्हिडिओबाबत संदीप कर्णिक यांचा खुलासा

ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले? याचा खुलासा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केला आहे. पोलिसांकडे असलेल्या व्हिडिओतील एकही व्हिडीओ बाहेर आलेला नाही. मात्र, अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयनेच्या माध्यमातून हे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ऋषिकेश वैद्यला अटक

पुण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियातून महिलेशी संपर्क साधून आधात्माच्या नावाखाली वैद्यने महिलेवर अत्याचार केला होता.

नेपाळच्या माजी पंतप्रधानांना अटक

जेन झी आंदोलना नादरम्यान विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक कऱण्यात आली आहे. माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही नेत्याच्या अटकेबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आदेश दिला होता. नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली.

पुणे महापालिकेला हायकोर्टाची नोटीस

पदपथावर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस दंड आकारतात मात्र महापालिकेचा पण दंड आकारला जातो. याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाचीदाखल करण्यात आली होती. त्यावरून पुणे महापालिकेला चार आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्याच्या सूचना यावेळी मुंबई हाय कोर्टाने दिल्या आहेत. विजय सागर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

एम. देवेंद्र सिंग (२०११) यांची बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहआयुक्त म्हणून बदली

डॉ. मैनक घोष (२०१९), जिल्हा परिषद, धाराशिव, यांची सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालीये

प्रियंवदा म्हाड्डळकर (२०२२) यांची जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली

अशोक काकडे (२०१०), जिल्हाधिकारी, सांगली यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून नियुक्ती

पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी निकाली काढा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणीपुरवठ्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग स्तरावर दर महिन्याला बैठक आयोजित करुन जास्तीत जास्त तक्रारी निकाली काढाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

अशोक खरात भोवती फास आवळला, फॉरेन्सिक रिपोर्ट तयार

भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडीत आहे. त्यांच्या कुकर्मांचा 'फोरेन्सिक रिपोर्ट' तयार असून तो लवकरच एसआयटीला मिळणार आहे. खराती पोलिस कोठडी रविवारी संपत असून या अहवालामुळे न्यायालयात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT