Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharastra Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विदीप जाधव यांच्या घरी

Maharashtra Politics Live Update: आज सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 सुनेत्रा पवार सातारा जिल्हा दौरा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघातावर माजी गृहमंत्र्यांकडून शंका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. हवामान चांगले असतानाही विमान कसे कलंडले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अपघाताच्या चौकशीतून सत्य समोर येईल असे सांगत, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत दहा दिवसांनी मोठे खुलासे करणार असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.

Sunetra Pawar उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.

Sanjay Raut : बेपत्ता मुली शोधण्याची जबाबदारी कुणाची? संजय राऊत यांचा सवाल

मुंबईतील मुलं बेपत्ता प्रकरणावरुन संजय राऊत यांनी सरकारला निशाण्यावर घेतलं आहे. रोहित शेट्टीच्या घरावरील हल्ला करणाऱ्यांना 24 तासांत पकडलं जात असेल तर सामान्यांच्या घरातील मुली बेपत्ता होत असतील तर ही जबाबदारी कुणाची? असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला आहे.

Gold Rate : सोन्या अन् चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण...

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार 800 रुपये तर, चांदीच्या दरात तब्बल 53 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपये तर, चांदीचे दर 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर आले आहेत. दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा दीड लाखावर तर चार लाखांचा आकडा पार करणाऱ्या चांदीचे दर देखील अडीच लाखांवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Hasan Mushrif Update : 'अजितदादांनी 'तुतारी' अन् 'घड्याळ' चिन्हं जवळपास एकत्र केलं होतं!'

अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा होती का? या वर उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "अजितदादांनी जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये मी वक्तव्य ऐकलं. पंरतु आम्हा राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींना घेऊन अशा चर्चा कधी झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी दादांनी चिन्ह एक केलं, ज्याला तुतारीवर लढायचचं त्यांनी त्यावर लढा अन् ज्यांना घड्याळ चिन्हावर लढायचं त्यावर लढा असं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी दादांनी सांगितलं तसं लढलो, मात्र दादांनंतर आता अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत."

Supriya Sule And Sunetra Pawar : दादांबरोबरचा जुना फोटो शेअर करत @बारामती…; सुप्रिया सुळे यांचे एक नवीन व्हॉट्सअप स्टेट्स!

सुप्रिया सुळे यांनी एक नवीन व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले. ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी खास कॅप्शनही दिले. सुप्रिया सुळे यांनी @ बारामती…… असे कॅप्शन दिले आहे. या व्हॉट्सअप स्टेट्सच्या माध्यमातून काहीतरी मोठे संकेत देताना सुप्रिया सुळे या दिसत आहेत.

Hasan Mushrif : विलिनीकरणासाठी जयंत पाटील माझ्याशी बोलले होते; हसन मुश्रीफांचा मोठा दावा

अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांनी मोठा दावा केला आहे. 'दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटील माझ्यासाठी बोलले होते. पण आम्हाला घेऊन कोणत्याही बैठका झाल्या नसल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut : 'अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत'

'अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत', अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर, पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? असेही गंभीर प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहे.

Jaykumar Gore : 'AIMIM'ची लायकी जास्त..; जयकुमार गोरे यांची टोलेबाजी

'आमचा सुफडा साफ करणाऱ्यांच्या पेक्षा 'AIMIM'ची लायकी जास्त आहे. सोलापूर महापालिकेत काँग्रेसला दोन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खातेही उघडता आले नाही. तर 'AIMIM'यांच्या पेक्षा मोठा पक्ष ठरला. 'AIMIM'ची लायकी यांच्यापेक्षा जास्त आहे. भाजपला संपवणारे अजून जन्माला यायचे आहे,' अशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.

BMC Election 2026 Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेनेचा मुंबई महापालिकेतील गटनेता ठरला

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील 29 नगरसेवकांची आज गट नोंदणी केली जाणार आहे. तत्पूर्वी शिंदेसेनेकडून मुंबई महापालिकेतील गटनेते पदासाठी अमेय घोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.

Sunetra Pawar : मयत सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट घेणार

अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला तेव्हा सुरक्षारक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानात होते. विमान कोसळल्यानंतर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सांत्वनपर भेट घेणार आहे.

सुनेत्रा पवार प्रितीसंगमावर दाखल झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.

Mumbai live :मुंबईचा महापौर आज ठरणार

Mumbai live :मुंबईचा महापौर आज ठरणार

मुंबईचा महापौर कोण होणार यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापालिकेच्या सत्ता स्थापनेचे सूत्र आज ठरणार. आहेत. महायुती दोन गटात नगरसेवकांची नोंदणी करणार आहे. भाजपचा एक गट तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नोंदणी करणार आहेत.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच आज दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत. आज (2 फेब्रुवारी) सुनेत्रा पवार या कराड आणि फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार या कराड येथील प्रितीसंगम बाग येथे जातील. त्यानंतर सुनेत्रा पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील. फलटणमध्ये विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT