MPSC मार्फत घेण्यात येणारी गट क संयुक्त पूर्व परिक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली असून 25 ऑक्टोबर 2026 ला होणारी परीक्षा आता थेट 3 जानेवारी 2027 ला होणार आहे. सणासुदीचा कालावधी, हिवाळी अधिवेशन आणि इतर कारणामुळे परीक्षा पुढे ढकलत असल्याचे कारण देण्यात आले आहे.
पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मार्गी लागत नसतील, तर नेमकी सत्ता कोणाची? असा सवाल आता खुद्द भाजपच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दहा-दहा दिवस लागतात, सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी मिळत नाही, माईक बंद केला जातो आणि ठेकेदारांची मक्तेदारी कायम आहे, अशा तक्रारींचा पाढाच नगरसेवकांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासमोर वाचला असल्याचे सांगितले जात आहे.
मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती बरीच ढासळली आहे. येत्या 12 ऑगस्टला जरांगेंनी मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत जमण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आता जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार आणि गुरुवारी शहरातील दारुची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने इस्कॉन जुहू कॅम्पसमधील तीन फूड युनिट्सचे परवाने निलंबित केले आहेत. 3 सप्टेंबर 2026 रोजीच्या तपासणीत अन्न सुरक्षा, स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि अन्न साठवणुकीशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले.
मनोज जरांगे पाटील मागील बारा दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. डिहायड्रेशन झाले होते. मात्र, आज त्यांनी सलाईन आणि पाणी घेतल्यामुळे आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांची दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.