Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : मिशन 3 मुंबई, मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईला निघणार?

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा घोषणेसह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...

सरकारनामा ब्युरो

Maratha Reservation : मिशन 3 मुंबई, मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईला निघणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची तयारी? जालना ते मुंबई जाण्यासाठी जालन्यात मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे. अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे. दुसऱ्या बाजूला सकल मराठा समाजाच्यावतीने मुंबईला जाण्यासाठी तयारी केली जात असून जालन्यात मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे.

Sangli Update : सांगलीत दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांनी महाआरती, सरकारला सद्बुद्धीसाठी शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडे...

सांगलीच्या जत तालुक्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली असून जत तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी जत तालुक्यातील संख येथे विठ्ठलाला साकडे घालण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महाआरती करत राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जत तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, असे साकडे घालण्यात आले.

China Rain : मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून चीनमध्ये 20 हून अधिकांचा मृत्यू

चीनच्या आग्नेय भागातील जिआंग्शी प्रांतात गेल्या आठवड्याच्या अखेरीस मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. यात अनेकजण मृत्युमुखी पडले असून आणखी एक मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या 20 हून अधिक झाली आहे, अशी माहिती सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिली. चीनच्या पूर्व किनाऱ्यावर सौडेल चक्रीवादळ धडकल्यानंतर. सुइचुआन काउंटी परिसरात अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत होता.

Oil Rate : दक्षिण अमेरिका इंधनाचे दर घटविले

ब्राझीलमधील इंधनाचे दर कमी करण्याच्या उद्देशाने अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी अध्यादेश आणि तात्पुरता कायदा जारी केला. अध्यक्षीय निवडणुकीला काही आठवडे शिल्लक असताना आणि अमेरिका-इराण युद्धामुळे इंधनाचा खर्च वाढत असताना हे निर्णय घेण्यात आले. या बेजबाबदार युद्धाचा फटका आम्ही तुमच्या खिशाला बसू देणार नाही, असे लुला यांनी यावेळी सांगितले.

Nashik News : युवकांसाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’ उपक्रम

युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेत त्यांच्या कल्पना, नेतृत्वगुण आणि नवकल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा युवा अधिकारी अभिलाष म्हस्के यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या उपक्रमात 15 ते 29वयोगटातील युवकांना सहभागी होता होईल.

Nashik Big News : आदिवासींचा ‘लाँग मार्च’; पाच हजार आदिवासी मोर्चात सहभागी होणार

आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून धरणे आंदोलन करणारे युवक 28 सप्टेंबरला नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणार आहेत. राज्यातील पाच हजार आदिवासी या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज असून पाच ऑक्टोबरच्या दरम्यान हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT