Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : राज्यातील जिल्हा परिषद 'CEO'ची महाबळेश्वरात कार्यशाळा; 'उमेद मॉल'बाबत मंत्री गोरेंनी व्यक्त केली नाराजी

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये तयारी सुरू, महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल,

Roshan More

Shrirampur : मतमाऊलीच्या दर्शनासाठी सहा लाख भाविकांचा सागर; हरेगावला ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून अधिकृत मान्यता

श्रीरामपूर तालुक्यातील ऐतिहासिक संत तेरेसा चर्च (हरेगाव मतमाऊली भक्तीस्थान) येथील 78 वा मतमाऊली यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. राज्यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या सहा लाखांहून अधिक भाविकांनी मतमाऊलीचे दर्शन घेत नवस फेडले. यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. दरम्यान, नाशिक धर्मप्रांताचे महागुरूस्वामी बार्थोल बरेटो यांनी हरेगावला अधिकृत ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित केले. त्याबाबतचे घोषणापत्र त्यांनी स्थानिक धर्मगुरूंकडे सुपूर्द केले.

Mahayuti Government : राज्यातील जिल्हा परिषद CEOची महाबळेश्वरात कार्यशाळा; 'उमेद मॉल'बाबत मंत्री गोरेंनी व्यक्त केली नाराजी

राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची महाबळेश्वर येथे दोन दिवसांची कार्यशाळा पार पडली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात 15 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवून त्यावर आणखी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण विकासाच्या विविध योजनांचा आढावा घेत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे आणि पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी उमेद मॉल या संकल्पनेसाठी राज्य सरकार कडून निधी उपलब्ध असून देखील एकही उमेद मॉल तयार न झाल्याने नाराजी व्यक्त केली.

Beed Crime : परळी पोलिस ठाण्याच्या दारातच दोन गटांत तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

परळी पोलिस ठाण्याच्या दारातच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही वाद झाल्याने दोन्ही गट परळी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र वाद वाढल्याने पोलिस ठाण्याच्या अगदी दारातच दोन गट भिडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. व्हायरल व्हिडिओतील व्यक्तींवर पोलिसांकडून काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latur Rain : लातूरमध्ये पावसासाठी सामूहिक नमाज

पावसाने दडी मारल्याने लातूर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसासाठी लातूरमध्ये मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करून सामूहिक दुआ करण्यात आली. पाऊस पडावा, शेती-पिकांना दिलासा मिळावा आणि नागरिकांवरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे, यासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्यात आली. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले.

Nanded Maratha Andolan : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनासाठी नांदेडमध्ये जोरदार तयारी

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर राज्यातून मराठा एकटवायला सुरूवात झाली आहे. जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर नांदेडमधून मराठा बांधवांनी मुंबईकडे जाण्याची तयारी केली सुरू केली आहे. नांदेडच्या माहूर येथील मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी सज्ज होत असतानाच, जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांना समर्थन दिले आहे.

Palghar Eknath Shinde Shiv Sena : डाॅक्टर मारहाण प्रकरण; जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह शिवसेनेच्या सात कार्यकर्त्यांना अटक

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणातील पसार आठ पैकी सात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे . यामध्ये जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे . तर एक आरोपी अजूनही पसार असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून घेतला जात आहे. रिलीफ हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात 22 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी 14 जणांना अटक करण्यात आली असून आठ जण फरार होते, तर काही वेळापूर्वी पालघर पोलिसांनी आणखीन सात जणांना अटक केली आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दखल घ्या -अंबादास दानवे

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संवाद साधावा, अशी देखील ते म्हणाले.

आशाताई बुचके यांचे निधन

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांचे निधन झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना जुन्नर तालुक्यात आपला स्वतंत्र राजकीय ठसा उमटवला होता. ग्रामीण भागातील प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर त्या आक्रमकपणे भूमिका मांडत असत. त्यांच्या लढाऊ आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्या जुन्नरच्या राजकारणात विशेष चर्चेत राहिल्या.

रात्री उशीरा अंबडच्या डीवायएसपींनी घेतली मनोज जरांगेंची भेट

मुंबईकडे कूच करण्यासाठी निघणाच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची अंबडचेडीवायएसपी सिद्धेश्वर धुमाळ यांनी रात्री उशिरा मनोज जरांगेंची भेट घेतली. उपोषणस्थळी त्यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT