Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची मदत पॅकेज सरकारकडे मागणी

Marathi Breaking Live Headlines Updates: अमित शहांचा मुंबई दौरा, मनोज जरांगेंचे आंदोलन, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Mangesh Mahale

Farmer News : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची मदत पॅकेज सरकारकडे मागणी

यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी सरकारकडे विशेष ‘मदत पॅकेज’ची मागणी केली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील अनेक भागांतील सोयाबीन, टोमॅटो आणि अन्य खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे.

Student News : वैद्यकीय प्रवेशाची दुसरी यादी जाहीर; 10 हजार 938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ पदवी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या कोट्यांतर्गत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या दुसऱ्या यादीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या 11 हजार 196 जागांपैकी 10 हजार 938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली, तर 258 जागा रिक्त आहेत. ‘एमबीबीएस’च्या दुसऱ्या यादीत एकूण आठ हजार 579 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 8442 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

Thane Crime : अमली पदार्थांचा प्रमुख तस्करासह पाच जणांवर ‘मकोका’

ठाणे जिल्ह्यात 34.18 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी अमली पदार्थांचा प्रमुख तस्कर अमजद युसूफ पठाण आणि त्याच्या चार साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. पठाणविरुद्ध तीन राज्यांत 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मुरबाडमध्ये गांजा तस्करीचा पर्दाफाश, दोघांना अटक

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 किलो 960 ग्रॅम गांजा, ज्याची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे, आणि वाहन व मोबाईल असा एकूण 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील मानाच्या गणपतींचे  सांयकाळी दर्शन घेणार आहेत.  

बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण

बुलडाण्यामध्ये स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव होत असल्याची माहिती आहे. तीन आठवडे स्वाइन फ्लूचा रुग्ण विविध डॉक्टरांकडे उपचार घेत फिरल्याने आजार पसरण्याचा धोका वाढला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खासगी डॉक्टरांकडून इपिडेमिक ऍक्ट 1897 चं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक निघणार पारंपारिक पद्धतीने. सकाळी आठ वाजता मुख्य मंडप येथून मिरवणूक सुरू होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मयुरेश्वर रथातून मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता निघणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज लालबाग राजाचं दर्शन घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT