अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देण्याची ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यानुसार मुंबई वगळता ‘एमएमआर’ क्षेत्रातील अंबरनाथ, कल्याण परिसरात 1400 घरे उभारली जाणार आहेत. त्यापैकी सुमारे 950 घरांचे काम सुरू असून, उर्वरित 450 घरे वेगवेगळ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तीन वर्षांत सर्व घरांचे काम पूर्ण केले जाईल.
प्रशासकीय व्हॉट्सॲप समूहांचा वाढता वापर आणि शिक्षकांवर पडणारा अशैक्षणिक कामांचा ताण याविरोधात राज्य प्राथमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहाला जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरीय प्रशासकीय व्हॉट्सॲप समुहांतून बहुतांश शिक्षक एकाच वेळी बाहेर पडले.
सणासुदीत वांद्रे टर्मिनसवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणामार्फत 3700 प्रवाशांना सामावून घेणारे नवे ‘होल्डिंग एरिया’ उभारण्यात येत आहे. 16.43 कोटी खर्चाच्या या सुविधा केंद्राचे काम सुरू असून, दिवाळीपूर्वी ते प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. एकूण 2625 चौरस मीटर क्षेत्रात हे केंद्र उभारले जात आहे.
दुष्काळामुळे राज्यातील खरीप हंगाम हातचा गेल्याने बळिराजा हवालदिल झाला असून भरपाईबाबत मात्र सरकारी पातळीवर अद्याप फारशा वेगाने हालचाली होत असल्याचे दिसून येत नाही. या भरपाईसाठी ‘पावसाची तूट’ आणि ‘प्रदीर्घ खंड’या दोन निकषांचा विचार केला जातो पण आता प्रशासनाने त्याची पडताळणी सुरू केली आ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.