यवतमाळ जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय,सरकारने भरीव मदत न केल्यास गळफास लावून आत्महत्या करण्याऐवजी खिशात एखादा बॉम्ब टाकून मंत्र्याला मिट्टी मारून मरू अशा संताप यावेळी तरूण शेतकऱ्यांने व्यक्त केला आहे.
दक्षिण मुंबईतील काळाचौकीचा महागणपती मंडळाच्या परिसरात वीजेचा झटका लागून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री भाविक मोठ्याप्रमाणावर काळाचौकीचा महागणपतीच्या दर्शनाला आले होते. याठिकाणी वीजेचा झटका लागून पाच जण जखमी झाले. यामध्ये लहान मुलांचा आणि तरुणांचा समावेश आहे. वीजेचा झटका लागून जखमी झालेल्यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे सर्वजण 8 ते 20 या वयोगटातील आहेत. जखमींपैकी आठ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आलेल्या 25 वर्षीय तरुणाची अचानक प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री घडली. जयदीप मेघराज नेमाडे (वय 25) असे मृत भाविकाचे नाव आहे. तो पुण्यातील बावधन येथील रहिवासी होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.