Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : भारताच्या परकीय गंगाजळीत 9.9 अब्ज डॉलरची वाढ

Marathi Breaking Live Headlines Updates: आज पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गुंज कार्यक्रम, राज्यातील राजकीय. प्रशासकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Mangesh Mahale

Mumbai News : भारताच्या परकीय गंगाजळीत 9.9 अब्ज डॉलरची वाढ

भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9.905 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, 14 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय गंगाजळी 716.907 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.

Amravati News : निवृत्त न्यायाधीशांच्या घराची 8 दिवस रेकी; 11 लाखांची चोरी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद

अमरावतीच्या परतवाड्यातील सिव्हील लाईन परिसरात निवृत्त न्यायाधीशांच्या बंद घराची रेकी करून तब्बल 11 लाख 90 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. चोरीच्या आठ दिवस आधी आरोपींनी कट रचला होता. 80 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 210 सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करत स्थानिक गुन्हे शाखा आणि परतवाडा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या टोळीचा छडा लावला. आरोपींकडून 67.02 ग्रॅम सोन्याचे दागिने, 76 हजार 700 रुपये रोख, तीन वाहने आणि पाच मोबाइल, असा 11 लाख 22 हजार 686 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Latur Big News : लातूरमध्ये 2 हजार 134 कोटीचा महाघोटाळा; आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून

विविध 16 कंपन्याशी संगनमत करत लातूरच्या उदगीर येथील एकाने तब्बल 2 हजार 143 कोटी 79 लाख 43 हजार रुपयाचा आर्थिक आणि फसवणूक करत महाघोटाळा केलाचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी रात्री उशिरा उदगीर पोलिसात श्याम शिवप्रसाद कलानी यांच्यासह सोहळा कंपन्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या तीन दिवसापासून उदगीर शहरात आयकर विभागाच्या विविध पथकाकडून चौकशी सुरू होती. या चौकशी अखेर हा आर्थिक घोटाळा समोर आला आहे.

Shivsena (UBT) : शिवसेना UBT पक्षाचं उद्या तिरंगा आंदोलन

शिवसेना UBT पक्षाचं उद्या तिरंगा आंदोलन होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मैदाने वाचवण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता हे तिरंगा आंदोलन होणारआहे.

Nashik News: अशोक खरातनंतर नाशिकमध्ये भोंदू विशाल खडांगळेला अटक

लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा करणारा नाशिकमधील भोंदू विशाल खडांगळेला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेकडून 77 हजार रुपये लुटले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशोक खरातनंतर नाशिकमध्ये भोंदूगिरीचा 12वा गुन्हा करण्यात आला आहे.

Pune: काँग्रेस आणि अभाविपमध्ये राडा, काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी

पुण्यात काँग्रेस आणि अभाविपमध्ये झालेल्या वादात काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून जखमींवर संचेती रुग्णालयात उपचार सुरु आहे. काँग्रेस नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

ABVP Congress clash: अभाविपच्या तक्रारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्यातील COEP महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि काँग्रेसच्या युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभाविपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Rahul Gandhi: पुण्यात आज आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएस मैदानावर राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊपर्यंत कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे. ८ ते १० हजार नागरिक अपेक्षित असून, किमान चार प्रवेशद्वार, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वयंसेवक, सीसीटीव्ही आणि आवश्यक एनओसी बंधनकारक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT